जम्मू काश्मीर : श्रीनगरमध्ये (srinagar) सध्या दहशतीचे वातावरण आहे. दहशतवादी संघटना काश्मीर खोऱ्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करतेय. यामुळे अल्पसंख्यांकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कारण दहशतवादी अनेक निष्पाप मुस्लिमांनाही (muslim) मारतायत. या हल्ल्यात काश्मिरी मुस्लिम तर काश्मिरी पंडितही (kashmiri pandit) मृत्यूमुखी पडलेत. गेल्या काही दिवसांत अल्पसंख्यांक असलेल्या काश्मिरी पंडितावर केल्या जाणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या खोऱ्यातील काश्मिरी पंडितांनी आपल्या कुटुंबासोबत स्थलांतर करण्याला प्राधान्य दिलं आहे. गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका काश्मिरी पंडिताचा आणि एका काश्मिरी शिख व्यक्तीचा मृत्यू झाला होता. दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) नुकत्याच काश्मिरी पंडितांवर आणि अल्पसंख्यांकांवर झालेल्या हल्ल्यांमागे आयएसआयचे (ISI) सुनियोजित षडयंत्र आहे. असे सांगण्यात येत आहे.
गुप्त बैठकांमध्ये शिजतोय कट, सुरक्षा यंत्रणांकडून अलर्ट जारी
गुप्तचर अहवालांनुसार, भारतीय गुप्तचर संस्थांना आयएसआय आणि दहशतवादी संघटनांमधील गुप्त बैठकांचे अनेक संकेत मिळाले आहेत. हे लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणांनी अलर्ट जारी केला आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने (ISI) अलीकडेच पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) अनेक दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण करण्यासाठी मोठे षड्यंत्र रचलं गेलं आहे, असं सांगण्यात येतंय. या अंतर्गत सुमारे 200 लोकांना लक्ष्य करून त्यांची हत्या करण्याची तयारी करण्यात आली होती.
घुसखोरीच्या माध्यमातून नवीन दहशतवादी पाठवण्याचे प्रयत्न
दरम्यान लष्कर आणि सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांना रोखण्यासाठी ऑपरेशन केले जात असूनही, दहशतवादी गटांना पाकिस्तानकडून सतत पाठिंबा मिळत आहे. घुसखोरीच्या माध्यमातून नवीन दहशतवादी पाठवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.