Video : कारमध्ये बसले होते माजी पंतप्रधान, ड्रायव्हर काच उघडून महिलेच्या तोंडावर थुंकला; व्हिडीओ पाहा

Video : कारमध्ये बसले होते माजी पंतप्रधान, ड्रायव्हर काच उघडून महिलेच्या तोंडावर थुंकला; व्हिडीओ पाहा
Updated on

लंडनः सोशल मीडियामध्ये एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानुसार पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ ज्या गाडीमध्ये होते, त्याच गाडीच्या चालकाने त्यांच्यासमोरच एका महिलेच्या तोंडावर थुंकण्याचा प्रकार केला.

सदरील महिलेने पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याबद्दल एक विधान केल्याचं दिसून येतंय. त्यानंतर चालकाने ही कृती केली. याचा व्हिडीओ व्हायरल होत असून नवाज शरीफ यांच्याबद्दल संताप व्यक्त होतोय.

Video : कारमध्ये बसले होते माजी पंतप्रधान, ड्रायव्हर काच उघडून महिलेच्या तोंडावर थुंकला; व्हिडीओ पाहा
PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोलापूरमधील 15 हजार घरांचे होणार लोकार्पण, कोणाला मिळणार लाभ?

व्हिडीओमध्ये दिसतंय की, सदरील महिलेने अगोदर गाडी थांबवली. गाडीमध्ये ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर कथितपणे नवाज शरीफ प्रवास करत होते. गाडी थांबल्यानंतर ड्रायव्हरने काच खाली घेतली. तीने कथिपणे नवाज शरीफ यांना विचारलं की, तुम्ही तेच भ्रष्ट नेते आहात का? त्यानंतर ड्रायव्हरने तिच्या तोंडावर थुंकलं आणि खिडकीची काच लावून घेतली.

सदरील घटना खुद्द महिलाच कॅमेऱ्यात रेकॉर्ड करीत होती. त्यामुळे त्याचा व्हिडीओ बनला आणि व्हायरल झाला. अनेक सोशल मीडिया साईट्सने व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच पाकिस्तानी सोशल मीडिया चर्चा मंच सियासत डॉट पीकेनेही व्हिडीओ शेअर केला. 'न्यूज १८ हिंदी'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.