Pakistan Inflation : 'रमजान सुरू आहे, आता तरी पगार द्या…'; पाकिस्तानात पायलट वैतागले

pakistan pia pilots salary pending during Ramzan pakistan inflation flight boycott
pakistan pia pilots salary pending during Ramzan pakistan inflation flight boycott
Updated on

भारताचा शेजारी देश पाकिस्तान हा सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यादरम्यान पाकची सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटकनॅशनल एअरलाईन (PIA) चे पायलटनी सरकारविरोधात बोलायला सुरूवात केली आहे. या पायलट्सना रमजानच्या पवित्र महिन्यात देखील त्यांचं रखडलेलं वेतन मिळालेलं नाहीये. त्यामुळे वैमानिक कामावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत.

एआरवाय न्यूज च्या हवाल्याने आज तकने दिलेल्या वृत्तानुसार सरकार पैसा नसल्याने पीआयएचे वैमानिकांसह संपूर्ण स्टाफचे वेतन देऊ शकत नाहीये.

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइनचे पायलट त्यांना रमजान महिन्यात देखील पगार न मिळाल्याने वैतागले आहेत. आर्थिक संकटादरम्यान फेडरल बोर्ड ऑफ रिव्हेन्यू ने पीआयए च्या अकाउंटमधून १.४ अब्ज रुरये डिडक्ट केले आहेत. मात्र अर्थ मंत्रलयाने पीआयए अॅडमिनिस्ट्रेशनच्या मदतूे ०.३ अब्ज रुपये अकाउंटमध्ये जमा करुन घेतले आहेत. याव्यतिरीक्त एफबीआरने पुढच्या आठवड्यापर्यंत पीआयएला १.७ अब्ज रुपये टॅक्सची रक्कम जमा करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

pakistan pia pilots salary pending during Ramzan pakistan inflation flight boycott
PM Modi Safari News : सफारीमध्ये वाघ दिसलाच नाही म्हणून पंतप्रधान रूसले; ड्रायव्हरवर ठपका, पण…

पीआएएच्या कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे की सध्याची महागाई आणि रमजान महिन्यादरम्यान सरकारने त्यांचं वेतन द्यावं, तसेच पीआयए पायलट विमान उड्डाणे बंद करण्याबाबद देखील विचार करत आहेत.

यापूर्वी देखील पाकचे वित्तमंत्री मोहम्मद इशाक डार शक्य ते मार्ग वापरून सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटी, पाकिस्तान इंटरनॅशल एअरलाइन्स आणि पाकिस्तान रेल्वे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी संपूर्ण सपोर्ट देण्याचे आश्वासन दिलं होतं.

pakistan pia pilots salary pending during Ramzan pakistan inflation flight boycott
Ajit Pawar News : 'अजित पवार भाजप बरोबर जाणार….'; 'त्या' ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

यापूर्वी काही महिन्यांपूर्वी संसदेतील विमानसेवांसंबंधी स्थायी समितीने देशातील बरेचसे पायलट देश सोडून गेल्याचं सांगितलं होतं. दिवाळखोरीचा सामना करत असलेली सरकारी एअरलइन पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे सीईओ आमिर हयात यांनी सांगितलं की नुकतेच १५ पायलट देश सोडून निघून गेले आहेत.

हयात यांनी सांगितले की पीआयए मध्ये नवीन वैमानिकांची भरती करण्यास तयार आहे पण त्याला मंजूरी मिळत नाहीये. यासोबतच पीआयए वर अब्जावधी रुपयांचे कर्ज असल्याचे देखील समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.