पाकिस्तानचे PM इमरान खान यांना मोठा धक्का; पीटीआय सरकारने बहुमत गमावले

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा सत्तेवरुन पायउतार होणार असल्याचे स्पष्ट चिन्हे दिसत आहे.
Pakistan Prime Minister Imran Khan
Pakistan Prime Minister Imran Khan
Updated on

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांचा सत्तेवरुन पायउतार होणार असल्याचे स्पष्ट चिन्हे दिसत आहे. त्यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (PTI) पक्षाला जोरदार झटका बसलाय. पीटीआयचा मित्रपक्ष कौमी मूव्हमेंट पाकिस्तान (MQMP) ने पीटीआयला पाठींबा न देण्याचा विचार केलाय.

एमक्यूएमने विरोधी पक्ष असलेल्या पाकिस्तान पीपुल्स पार्टी (PPP) सोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे आता इमरान खान यांच्या हातची सत्ता जाणार निश्चित आहे. फक्त औपचारिक घोषणेची प्रतिक्षा असल्याचे बोलले जात आहे. (Pakistan PM Imran Khan is set to lose his majority in the National Assembly)

Pakistan Prime Minister Imran Khan
भारतीय वंशाच्या सातजणांवर इनसाईडर ट्रेडिंगचा आरोप

एमक्यूएमने पीटीआयसोबतचा पाठिंबा काढल्यानंतर पीपीपी अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी एक ट्विट केले आहे. भुट्टो यांनी ट्विट करत म्हटले, “विरोधी पक्ष आणि एमक्यूएम यांच्यात एक करार झाला आहे. याविषयी आम्ही तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांद्वारे माहिती देऊ. ” त्यांनी पाकिस्तानला शुभेच्छा दिल्यात.

Pakistan Prime Minister Imran Khan
पुतिन आणि झेलेन्स्की यांची होऊ शकते भेट!

दरम्यान यानंतर इमरान खान यांनी प्रतिक्रिया दिली. काही लोक विदेशी पैशांच्या मदतीने त्यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केलाय. इमरान खान यांनी एका रॅलीमध्ये संबोधताना म्हटले होते की, पाकिस्तानमध्ये सरकार बदलण्यासाठी विदेशी पैसा पुरवला जात आहे. त्यासाठी आमच्या लोकांचा गैरवापर केला जातोय. काही लोक याच विदेशी पैशाचा वापर करु लागले आहेत. असे काही झाले तरी आम्ही राष्ट्रहिताशी कधीच समझोता करणार नाही.

Pakistan Prime Minister Imran Khan
Viral Video : आईने वापरली ट्रिक; रडणाऱ्या बाळाच्या चेहऱ्यावर आले लगेच हसू

पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीत एकूण 342 सदस्य संख्या आहे. बहुमतासाठी इथे 172 सदस्यांची आवश्यकता असते. मात्र एमक्यूएमने पाठिंबा काढल्यावर पीटीआय सरकारकडे केवळ 164 सदस्य संख्या राहली तर विरोधी पक्षाकडे 177 सदस्य संख्या झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.