"शेवटच्या चेंडूपर्यंत खेळेन"; इम्रान खान यांचा राजीनामा देण्यास नकार

pakistan pm imran khan said wont resign under any circumstance ahead of trust vote
pakistan pm imran khan said wont resign under any circumstance ahead of trust vote esakal
Updated on

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी, ते कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाहीत तसेच अविश्वास प्रस्तावावर विरोधी पक्षांना पराभवाला सामोरे जावे लागेल असे म्हटले आहे. इम्रान खान म्हणाले की, विरोधकांनी आपले सर्व पत्ते उघड केले आहेत, परंतु त्यांच्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव यशस्वी होणार नाही. कोणत्याही दबावाखाली राजीनामा देण्याचे त्यांनी स्पष्टपणे नाकारले.

ते म्हणाले की, 'मी कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाही. मी शेवटच्या चेंडूपर्यंत खेळेन आणि आदल्या दिवशी त्यांना आश्चर्यचकित करेन कारण ते अजूनही दबावाखाली आहेत. मात्र, त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. ते पुढे म्हणाले, 'मी घरी बसेन, असा गैरसमज कोणीही करू नये. मी राजीनामा देणार नाही. चोरांच्या दबावाखाली मी राजीनामा द्यावा का?' असा सवाल देखील त्यांनी केला.

pakistan pm imran khan said wont resign under any circumstance ahead of trust vote
युध्दाच्या विरोधात पुतिन यांच्या सल्लागाराचा राजीनामा; सोडला देश

या सगळ्यात लक्षात घेण्यासारखे आहे की, पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष असद कैसर यांनी 25 मार्च रोजी अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी अधिवेशन बोलावले आहे. भ्रष्टाचाराशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नसल्याचे खान म्हणाले आहेत. दरम्यान पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांच्यावर भ्रष्टाचाराचे राजकारण केल्याचा आरोपही त्यांनी केला.

pakistan pm imran khan said wont resign under any circumstance ahead of trust vote
लॉंच होताच Maruti ही कार ठरतेय हीट; ग्राहकांकडून प्रचंड मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.