पंतप्रधानांनी बुद्धांची मूर्ती ट्विट करताच, भारतीयांनी दिला 'हा' सल्ला

Imran Khan
Imran Khanesakal
Updated on
Summary

इम्रान खानचे मित्र असलेल्या तालिबाननं अफगाणिस्तानातील प्रसिद्ध बुद्ध मूर्तीमध्ये स्फोट घडवण्याचे आदेश दिले होते.

इस्लामाबाद : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानी (Taliban) दहशतवाद्यांना उघडपणे पाठिंबा देणाऱ्या पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांनी नुकतंच भगवान बुद्धांचं चित्र असलेलं शिल्प ट्विट केलंय आणि यानंतर त्यांना जोरदारपणे ट्रोल केलं जातंय. इम्रान यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, की स्वात खोऱ्यातील जहानाबादमध्ये असलेलं हे शिल्प बुद्धांच्या प्रतिमेचं सुंदर चित्र आहे. तसेच हे शिल्प सुमारे 2000 वर्ष जुनं असल्याचंही त्यांनी सांगिलंय. इम्रान खान यांच्या या ट्विटला मोठ्या संख्येनं भारतीयांनी ट्रोल करण्यास सुरुवात केलंय. त्यांनी म्हटलंय, की तुमच्या तालिबान मित्रांप्रमाणे या मुर्ती तोडू नका, असा सल्ला इम्रान यांना दिलाय.

इम्रानच्या ट्विटला उत्तर देताना भारताचे रहिवासी विकास पांडे यांनी ट्वीटमध्ये म्हंटलंय, आता फक्त ही मूर्ती तोडू नका, म्हणजे झालं. कारण, शेवटी तुमच्या इतिहासाचा तो एक भाग आहे. विनीत लिहितात, जर ही मूर्ती तिथं असती, तर ती मोडली असती. त्यामुळे या मूर्तीला तोडण्यासाठी स्फोटकांचा वापर करावा लागेल. मात्र, .यासाठी पाकिस्तानकडे पैसे नाहीत, असा उपरोधिक टोला त्यांनी इम्रान यांना लगावलाय.

Imran Khan
हिंदू मंदिरांवर दगडफेक, तोडफोड करणाऱ्यांना मी सोडणार नाही

स्वप्नील अग्रवाल लिहितात, इम्रान बुद्धांचं शिल्प पोस्ट करणं चांगलंय. पण, जर तुम्ही भगवान बुद्ध वाचले आणि त्यांच्या शिकवणींचं पालन केलं, तर तुम्ही अधिक चांगल्या स्थितीत राहू शकता. भगवान बुद्धांनी नेहमी शांती आणि मानवतेबद्दल शिकवलंय. दरम्यान, भारतीयांच्या या ट्विट्सनंतर पाकिस्तानी चांगलेच लालबुंद झालेत. इम्रान खानचे मित्र असलेल्या तालिबाननं अफगाणिस्तानातील प्रसिद्ध बुद्ध मूर्तीमध्ये स्फोट घडवण्याचे आदेश दिले होते आणि जगातील सर्वात उंच प्राचीन बुद्ध मूर्ती उद्ध्वस्त केली होती. तालिबाननं जगाला हा मोठा धक्का दिला होता.

Imran Khan
पाकिस्तानला महागाईच्या झळा! गॅस, तूप आणि मटणाचे दर गगनाला

तालिबानी अतिरेक्यांनी तोफांनी उडवली बुद्धांची मूर्ती

संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादी यादीत समाविष्ट असलेले तालिबानचे नेते मुल्ला हसन यांनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आणि 2001 मध्ये तालिबान सरकार सत्तेवर आल्यावर बामियानमधील भगवान बुद्धांच्या मूर्ती नष्ट करण्याचा आदेश दिला. तालिबानी अतिरेक्यांनी तोफांच्या गोळ्यांनी बुद्धांच्या प्रचंड मूर्ती उडवल्या. मुल्ला हसन यांनी याला आपलं धार्मिक कर्तव्य मानलं होतं. या काळात मुल्ला हसन तालिबान सरकारमध्ये उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.