पाकिस्तानमधील निवडणुकीत भारतीय गायक... प्रचारासाठी फोटोचा होतोय वापर

पाकिस्तानमधील निवडणुकीत भारतीय गायक...
Sidhu Moose Wala
Sidhu Moose Wala esakal
Updated on

पंजाब (पाकिस्तान) : भारतीय गायक सिद्धू मुसेवाला यांच्या छायाचित्रांचा पाकिस्तानमध्ये (Pakistan) वापर केला जात आहे. छायाचित्रे इम्रान खानच्या पाकिस्तान तेहरिक-इ-इन्साफच्या (पीटीआय) सदस्याकडून निवडणूक मोहिमेसाठी वापरले जात असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकत आहे. पीटीआयच्या झैन कुरेशी या पंजाबी गायकाच्या छायाचित्रांचा पंजाब प्रांतातील पोटनिवडणुकीसाठी वापर करित आहेत. ही पोटनिवडणूक १७ जुलै रोजी होणार असल्याचे वृत्त 'दी न्यू इंटरनॅशनल न्यूजपेपर' दिले आहे. (Pakistan Political Leader Uses Singer Moose Wala's Pictures For Poll Campaign)

Sidhu Moose Wala
पाकिस्तानमध्ये पेट्रोल २५० रुपये लीटर, अत्यावश्यक वस्तूही महाग

प्रचार मोहिमेतील छायाचित्रात झैन कुरेशींबरोबर माजी केंद्रीय मंत्री आणि पीटीआयचे उपाध्यक्ष शहा मेहमूद कुरेश आदी आहेत. पोस्टरवर स्थानिक पक्ष नेत्यांबरोबर सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) आणि त्याचा आवडता क्रमांक २९५ दिसत आहे. मी सर्वांचे आभार मानते ज्यांनी कोणी पोस्टरवर सिद्धू मूसेवाला यांचे चित्र प्रिंटेड केले. त्यामुळे हे पोस्टर प्रचंड व्हायरल झाले आहे. यापूर्वी कोणतेही पोस्टर व्हायरल झाले नव्हते, असे कुरेशी या बीबीसी उर्दूला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या.

Sidhu Moose Wala
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण : काम झाले आहे, साडेतीन लाख रुपये मिळाले

पोस्टरवर छायाचित्र कोणी प्रिंट केले आहे. याचा शोध घेत असल्याचे पीटीआय नेत्याने सांगितले. शुभदीप सिंग सिद्धू यांना सिद्धू मूसेवाला या नावाने ओळखले जात होते. त्यांची २९ मे रोजी भारतातील पंजाबमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.