प्रजासत्ताक दिनापूर्वी पाकिस्तानने केली 20 भारतीय मच्छिमारांची सुटका

20 मच्छिमारांना सोडल्यानंतरही पाकिस्तानच्या कैदेत अद्यापही 568 भारतीय मच्छिमार आहेत.
india-pakistan
india-pakistanindia-pakistan
Updated on

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या (Pakistan) सागरी हद्दीत घुसल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या 20 भारतीय मच्छिमारांना (Indian Fishermen In Pakistan) पाकिस्तान सोमवारी वाघा बॉर्डरवरून (Wagha Border) भारताच्या स्वाधीन करणार आहे. पाकिस्तानच्या एका वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याने ही माहिती दिली. रविवारी भारताच्या प्रजासत्ताक दिनापूर्वी (Republic Day) कराचीच्या लेंडी तुरुंगात ठेवण्यात आलेल्या मच्छिमारांना मानवतावादी आधारावर सोडण्यात आले. सुटका झालेल्या मच्छिमारांना बेकायदेशीरपणे पाकिस्तानी जलक्षेत्रात घुसून परवानगीशिवाय मासेमारी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. दरम्यान, 20 मच्छिमारांना सोडल्यानंतरही पाकिस्तानच्या कैदेत अद्यापही 568 भारतीय मच्छिमार आहेत. (Pakistan Released 20 Fishermen before Republic day)

india-pakistan
वीजबिलाचं पाप भाजपचं, ऊर्जामंत्र्यांचं विधान बरोबर नाही - नाना पटोले

भारत आणि पाकिस्तानने (India Pakistan Relation) या वर्षाच्या सुरुवातीला कैद्यांच्या यादीची देवाणघेवाण केली, त्यानुसार किमान 628 भारतीय कैदी पाकिस्तानमध्ये (Indian Pepople In Pakistan Jail) आहेत, त्यापैकी 577 मच्छिमार आहेत. भारताने पाकिस्तानसोबत 355 पाकिस्तानी कैद्यांची यादी सामायिक केली, ज्यापैकी73 मच्छिमार होते. ईधी फाऊंडेशनच्या प्रवक्त्याने सांगितले की, मच्छिमारांच्या लाहोरपर्यंतच्या प्रवासाचा खर्च संस्था उचणार असून, जिथे त्यांना भारताच्या सीमा सुरक्षा दलाकडे सुपूर्द केले जाईल. त्याशिवाय ईधी फाऊंडेशननेही सदिच्छा म्हणून प्रत्येक मच्छिमाराला (Fishermen) पन्नास-पन्नास हजार रुपये देण्यात येणार आहे. दोन्ही देशांमधील अरबी समुद्राच्या (Arebina See) किनारपट्टीमध्ये स्पष्ट सीमांकन रेषा नसल्यामुळे, ज्या मच्छिमारांकडे आधुनिक नेव्हिगेशन उपकरणे नाहीत ते चुकून सीमा ओलांडतात आणि कैदेत सापडतात असे मत, फिशरमेन्स फोरमने व्यक्त केले आहे.

india-pakistan
Budget 2022 : 'या’ अर्थमंत्र्यांनी मांडला नव्हता एकही अर्थसंकल्प! वाचा असं का?

पाकिस्तानच्या तुरुंगात (Pakistan Jail) चार वर्षे घालवलेला मच्छिमार भावेश भिकाने सांगितले की, तो ज्या बोटीवर होता ती रात्री पाकिस्तानच्या क्षेत्रात घुसली. दरम्यान, आम्ही पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला आहे, हे समजण्यासाठी आमच्याकडे कोणताच मार्ग नाही. त्यामुळे अनेकदा सागरी सीमेचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारत आणि पाकिस्तान एकमेकांच्या मच्छिमारांना अटक करतात, असे भिकाने यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.