Pakistan Terrorists: 'भारत आमच्या घरात घुसून दहशतवाद्यांना मारतोय'; पाकिस्तानचं रडगाणं.. चीननेही मिसळला सुरात सूर

China backs Pakistan charge of India hand in mysterious killings; Pakistan Terrorists! चीन पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांवर निर्बंध लादण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या प्रयत्नांना रोखत असल्याचा आरोप भारत सातत्याने करत आहे. हे होऊ नये म्हणून चीनने आपले विशेषाधिकार वापरले आहेत.
Pakistan Terrorists
Pakistan TerroristsEsakal
Updated on

भारत पाकिस्तानमध्ये घुसखोरी करत तेथील नागरिक आणि दहशतवादी मारत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानच्या या आरोपांचे चीननेही समर्थन केले आहे. इस्लामाबादने केलेल्या दाव्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे चीनने म्हटले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, दहशतवादाविरोधातील दुटप्पीपणाला आमचा विरोध आहे.

पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांवर संयुक्त राष्ट्रांनी निर्बंध लादण्याचे प्रयत्न केले. ते चीनने रोखल्याचा आरोप भारत सातत्याने करत आहे. असे अनेक प्रसंग घडले आहेत जेव्हा चीनने हे होऊ नये म्हणून आपले विशेषाधिकार वापरले आहेत.

Pakistan Terrorists
Maldives Politics : मालदीवमध्ये भरदिवसा रक्तपात! भारताचं समर्थन करणाऱ्या प्रॉसिक्यूटर जनरलवर चाकूहल्ला

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, दहशतवाद हा मानवतेचा समान शत्रू आहे. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा एकत्रितपणे लढा देण्यासाठी चीन सर्व देशांमधील दहशतवादविरोधी सहकार्य मजबूत करण्यासाठी उभा आहे.

पाकिस्तानने दावा केला होता की, आपल्याकडे भारतीय एजंट आणि गेल्या वर्षी दोन दहशतवाद्यांच्या हत्येमधील संबंधांचे पुरेसे पुरावे आहेत. भारताने पाकिस्तानवर निशाणा साधत हा देश दहशतवादाचे केंद्र बनला आहे, असं म्हटलं आहे.

Pakistan Terrorists
UPS Layoffs: शिपिंग अन् लॉजिस्टिक्स फर्ममध्ये दिलं जाणार नारळ, 12 हजार लोक होणार बेरोजगार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.