पाकिस्तान सध्या भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यादरम्यान पाकिस्तानने आता चीनकडे अतिरिक्त १० अब्ज युआन म्हणजेच तब्बल १.४ अब्ज डॉलर्सच्या कर्जाची मागणी केली आहे. पैशांच्या तुडवड्याचा सामना करत असलेल्या पाकिस्तानने याआधीच चीनकडून ३० अब्ज युआनच्या चीनी व्यापर सुविधेचा लाभ घेतला आहे.