Pakistan : भावा-बहिणीने संबंध ठेवणं योग्य की अयोग्य?; परीक्षेत विचारला प्रश्न अन् पाकिस्तान पेटलं

पाकिस्तानच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानेही या वादग्रस्त प्रश्नाची दखल घेतली आहे.
Pakistan News
Pakistan NewsSakal
Updated on

Pakistan News : भारताचा शेजारी राष्ट्र पाकिस्तान नेमकी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मात्र, आता ज्या कारणामुळे पाकिस्तान पुन्हा चर्चेत आले आहे ते बघून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Pakistan News
UPI-PayNow : भारत-सिंगापूरमध्ये क्रॉस बॉर्डर कनेक्टिव्हिटीला सुरूवात; सामान्यांना होणार फायदा

पाकिस्तानमध्ये एका परिक्षेतील प्रश्नावरून हा वाद सुरू झाला असून, यामध्ये भावा-बहिणीने संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

या प्रकरणानंतर कॉमसॅट्स युनिव्हर्सिटी विरोधात इस्लामाबादमधील शहजाद टाउन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नेमका प्रश्न काय?

कॉमसॅट्स युनिव्हर्सिटीतर्फे काढण्यात आलेल्या इंग्रजीच्या पेपरमध्ये भावा-बहिणीचे संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? असा प्रश्न विचारण्यात आला. एवढेच नव्हे तर, यावर विद्यार्थांना त्यांचे वैयक्तिक मत मांडण्यास सांगण्यात आले.

प्रश्नपत्रिका सोशल मीडिया साइटवर अपलोड होताच, नेटिझन्सनी विद्यापीठावर टीका करण्यास सुरुवात झाली. प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होताच वातावरण चांगलेच तापले आहे. विचारण्यात आलेला प्रश्न इस्लामिक शिकवणी आणि सामाजिक मूल्यांच्या विरोधात असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.

Pakistan News
Sonu Nigam: काय झालं होतं? शोमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सोनू निगमने सोडली मुंबई म्हणाला... व्हिडीओ व्हायरल

विद्यापीठाकडून प्राध्यपकावर कारवाई

दरम्यान, पाकिस्तानच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानेही या वादग्रस्त प्रश्नाची दखल घेतली आहे. मंत्रालयाने विद्यापीठाला या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर शिक्षा करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानंतर विद्यापीठाकडून आक्षेपार्ह प्रश्न विचारणाऱ्या प्राध्यपकावर कारवाई करत त्यांना काढून टाकण्यात आले आहे. तसेच त्यांचे नाव काळ्या यादीत टाकण्यात आल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()