Pakistan: रशिया युक्रेन युद्धात युक्रेनला मदत करण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेला शस्त्रे विकली आहेत. अशी माहिती एका अहवालातून समोर आली आहे.
या अहवालात पाकिस्तानी आणि अमेरिकन सरकारी कागदपत्रांचा हवाला देण्यात आला आहे. यात म्हटले आहेत की, पाकिस्तानने एका गोपनीय कराराअंतर्गत हे शस्त्र विकले आहेत. मात्र पाकिस्तानने हा आरोप फेटाळून लावला आहे.
'द इंटरसेप्ट' या संकेतस्थळानुसार पाकिस्तान आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. यासाठी पाकिस्तानला IMF कडून तीन अब्ज डॉलर्सचे बेलआउट पॅकेज मिळवायचे आहे. यासाठी पॅकेज मिळवण्यासाठीच पाकिस्तानने अमेरिकेच्या दबावाखाली हा करार केला आहे. मात्र, पाकिस्तानने हा आरोप फेटाळला आहे.
परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच म्हणाल्या की, रशिया-युक्रेन युद्धात पाकिस्तानचे धोरण तटस्थ आहे.पाकिस्तानचे शस्त्रास्त्र निर्यातीचे नियम कठोर आहेत. आमच्या देशाने कोणत्याही देशाला शस्त्रे किंवा दारूगोळा पुरविला नाही.
तर दुसरीकडे एप्रिलमध्ये एका मुलाखतीत युक्रेनच्या एका उच्च कमांडरने सांगितले होते की, पाकिस्तानसह अनेक देशांकडून आम्हाला शस्त्रे मिळाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.