Imran Khan: माझ्याकडे दोन पर्याय, आत्महत्या करणं किंवा पक्ष सोडणं.. इम्रान खान यांनी शेअर केले 'ते' मेसेज

पाकिस्तानच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये मोठा वाद सुरू
imran khan
imran khanEsakal
Updated on

पाकिस्तानच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये मोठा वाद सुरू आहे. अशातच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, सरकार जबरदस्तीने त्यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत सरकारवर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, सरकार नेत्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना पक्ष फोडण्याची धमकी देत ​​आहे. घरातील महिलांच्या नावाने नेत्यांना धमकावले जात आहे. त्यांच्या या ट्वीटमुळे मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

इम्रान खान यांनी आता पक्ष सोडलेल्या पीटीआय नेत्याच्या मेसेजच्या स्क्रीनशॉट त्यांनी शेअर केला आहे. मेसेजमध्ये नेत्याने इम्रान खान यांना पक्ष सोडण्याचे कारण सांगितले आहे. आता त्यांनी पाठवलेल्या उर्दूमध्ये मेसेज लिहला आहे.

'सभापती महोदय, पीटीआय सोडण्यासाठी माझ्यावर खूप दबाव होता. आता सहन होत नाही. माझ्या कुटुंबातील महिला आणि व्यवसायासाठी माझा छळ केला जात आहे. आता पक्ष सोडण्यासाठी पत्रकार परिषद घेण्याशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय नाही. असं होईल असं कधीच वाटलं नव्हतं.'(Latest Marathi News)

imran khan
US : दिल्लीत जाऊन स्वतः पाहा…; भारतातील लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना अमेरिकेचा सल्ला!

सभापती महोदय, तुम्ही पहिल्यांदा मियांवलीतून निवडणूक लढवली तेव्हापासून मी तुमच्यासोबत होतो. आता माझ्याकडे दोनच पर्याय आहेत, एकतर पक्ष सोडावा किंवा आत्महत्या करावी.

पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह खान यांनी सांगितले की, पीटीआय तीन गटांमध्ये विभागली जाईल. यामुळे पीएमएल-एनला त्याच्यापासून धोका होणार नाही. जहांगीर तारीनच्या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी शांत राहावे, असंही ते म्हणाले आहेत. आमची व्होट बँक कुठेही जाणार नाही. पंजाबमध्ये पीटीआय आणि पीएमएल-एन एकमेकांना आव्हान देत होते पण आता परिस्थिती बदलली आहे. पीटीआय तीन गटात विभागले जाईल, एक गट पीपीपीकडे जाईल आणि दुसरा जहांगीर तरीनसोबत जाईल. तर काही नेते पीटीआयमध्येच राहतील.(Latest Marathi News)

imran khan
Rahul Gandhi : भाजपकडे भविष्यवेधी दृष्टी नाही - राहुल गांधी

पाकिस्तान सरकारच्या आदेशानुसार इम्रान खान यांना ९ मे रोजी अटक करण्यात आली होती. यानंतर पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी जिना हाऊस, मियांवली एअरबेस, आयएसआय भवनसह अनेक लष्करी आस्थापनांची तोडफोड केली. रावळपिंडी येथील लष्कराच्या मुख्यालयावरही जमावाने हल्ला केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात सुमारे 10 जणांचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी, सुरक्षा दलाच्या गोळीबारात त्यांच्या पक्षाचे सुमारे 40 लोक मारले गेल्याचा दावा पीटीआयने केला आहे.

तर लष्कराच्या माध्यमातून पीटीआयला संपवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा इम्रान खान यांनी केला होता. या सर्व कटामागे पीडीएमचा हात आहे, जे देशासाठी अत्यंत घातक आहे. पाकिस्तानचे सरकार आता आमच्याकडून निवडणुका जिंकू शकत नाही, म्हणून ते आता लष्कराच्या मदतीने आम्हाला तोडत आहेत असंही त्यांनी म्हंटलं आहे.

imran khan
AI News : महिलेने केलं एआय बॉटशी लग्न; म्हणाली, परफेक्ट नवरा मिळाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.