Pakistan News : दहशतवाद्यांचा प्रवाशांनी भरलेल्या बसवर बेछूट गोळीबार! १० ठार, तर २५ जण जखमी

pakistan terrorist attack on bus in gilgit baltistan over 10 people killed 25 injured marathi news
pakistan terrorist attack on bus in gilgit baltistan over 10 people killed 25 injured marathi news
Updated on

पाकिस्तानच्या गिलगिट-बाल्टिस्तान भागातील काराकोरम हायवेर दहशतवाद्यांनी एका बसवर गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात किमान १० लोकांचा मृत्यू झाला असून इतर २५ जण जखमी झाले आहेत.

डायमेरचे डेप्युटी कमीश्नर आरिफ अहमद यांनी ही घटना संध्याकाळी साडेसह वाजता चिलासच्या हुदुर भागात झाल्याचे सांगितले. दहशतवाद्यांनी प्रवाशांनी भरलेल्या बसवर गोळीबार केल्यानंतर बस चालकाने नियंत्रण गमावल्याने बस समोरून येत असलेल्या ट्रकला धडकली.

पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये देशभरातील नागरिक प्रवास करत होते. तसेच मारले गेलेल्या नागरिकांमध्ये दोन सैनिकांचा देखील समावेश आहे. तसेच स्पेशल प्रोटेक्शन युनिटचा एक सदस्य देखील जखमी झाला आहे.

pakistan terrorist attack on bus in gilgit baltistan over 10 people killed 25 injured marathi news
Earthquake In Philippines : फिलीपिन्समध्ये पुन्हा 6.8 तीव्रतेचा भूकंप! त्सुनामीचा इशारा जारी

मीडिया रिपोर्ट्सनुसार डायमरचे पोलिस अधीक्षक सरदार शहरयार यांनी सांगितलं की, घटनास्थळावर काराकोरम हायवेचे पोलीस अधिकारी पोहचले होते. त्यांनी सांगितलं की मृतदेह आणि जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. एसपींनी सांगितलं की, घटनास्थळी असलेल्या इतर वाहनांना ताफ्याच्या स्वरूपात तेथून नेण्यात आले. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, पुरावे गोळा करण्यासाठी हल्ला झाला त्या ठिकाणाला वेढा घालण्यात आला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांमध्ये महिला आणि मुलांचा देखील समावेश आहे.

pakistan terrorist attack on bus in gilgit baltistan over 10 people killed 25 injured marathi news
Parliament Winter Session 2023 : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; या मुद्द्यांवर होणार चर्चा

द एक्सप्रेस ट्रिब्यून च्या रिपोर्टनुसार, कुठल्याही दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतली नाहीये. तसेच या हल्ल्यामागील कारण देखील समजू शकलेले नाीये. मुख्यमंत्री हाजी गुलबार खान यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे, तसेच त्यांनी घटनेच्या सखोल चौकशीसाठी विशेष पथक तयार करण्यची घोषणा केली आहे.

यापूर्वी २०१३ मध्ये काही दहशतवाद्यांनी गिलगिट बाल्टिस्तान मध्ये गिर्यारोहकांच्या कँपवर हल्ला केला होता. या हल्ल्यात ९ परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.