ईशनिंदा करणारा मजकूर हटवा; पाकची गुगल-विकिपीडियाला धमकी

google
google
Updated on

इस्लामाबाद : पाकिस्तानने गुगल आणि विकिपीडियाला इस्लाम संदर्भातील अपमानजनक तसेच ईशनिंदा करणारा मजकूर काढून टाकावा, यासाठी धमकी दिली आहे. पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन अथॉरिटी (पीटीए) ने गुगल आणि विकिपीडियावरुन इस्लाम अथवा महम्मद पैगंबरांच्या संदर्भातील वादग्रस्त मजकूर तात्काळ काढून टाकण्यास सांगितलं आहे. 

पीटीएने विकिपीडियावर मौलाना मिर्जा मसरुर अहमदच्या पेजबाबत हरकत घेतली आहे. यामध्ये त्यांना इस्लामचा 'खलीफा' म्हटलं गेलं आहे. मिर्जा मसरुर अहमद हे अहमदिया मुस्लिम समुदायाचे धार्मिक नेते आहेत. पाकिस्तानमध्ये अहमदिया समुदायाला मुस्लिम म्हणून मान्यता मिळाली नाहीये. यासोबत गुगल प्ले स्टोअरवर कुरानच्या प्रतिबाबतही हरकत घेण्यात आली आहे. पीटीएने मिर्जा मसरुरच्या विकिपीडियावर मुस्लिम या उल्लेखाबाबत तसेच त्या पेजवर असलेल्या माहितीला भ्रामक आणि चुकीची ठरवून तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे. जर या चुकांना तात्काळ दुरुस्त केलं गेलं नाही तर याविरोधात इलेक्ट्रॉनिक क्राइम प्रिव्हेन्शन ऍक्ट 2016 च्या अंतर्गत कारवाई केली जाईल, असं म्हटलं आहे. 

टीकटॉक, टींडर आणि ग्रिंडरवर आहे बंदी
अलिकडील काही महिन्यात पाकिस्तानमध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरील नियंत्रण वाढले आहे. पाकिस्तानमध्ये टिकटॉक, टिंडर आणि ग्रिंडर या ऍप्सवर बंदी आहे. टीकाकारांचं म्हणणं आहे की, सरकार डिजीटल माध्यमांवर सेंसॉरशीपचा प्रयत्न करत आहे. यावर्षीच पाकिस्तान सरकारने आक्षेपार्ह मजकूराचा आरोप करत टीकटॉक या ऍपवर बंदी आणली होती. तसेच याआधीच अनैतिक तसेच अशोभनीय मजकूराला अटकाव घालण्यासाठी म्हणून टिंडर आणि ग्रिंडरसहीत इतर अनेक लोकप्रिय डेटिंग ऍपवर देखील बंदी घातली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.