पाकिस्तानमध्ये दहशतवाद विरोधात विशेष मोहिम, २० दहशतवादी मारल्याचा दावा

पाकिस्तानी लष्कराच्या शिबीरांवर दहशतवादी हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात विशेष मोहिम सुरु केली आहे.
Pakistan Army
Pakistan Armyesakal
Updated on

इस्लामाबाद : पाकिस्तानी लष्कराने या आठवड्याच्या सुरुवातीला अशांत बलुचिस्तान प्रांतात सुरक्षा दलांच्या शिबीरांवर दहशतवादी (Terrorist) हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात मोहिम सुरु केली आहे. लष्कराने म्हटले, की या अभियानात २० दहशतवादी मारले गेले आहे आणि ही मोहिम यशस्वी झाली आहे. दहशतवाद्यांनी बुधवारी नौशकी आणि पंचगुर भागांमध्ये सेनेच्या शिबीरांवर हल्ला केला होता. मात्र सुरक्षा दलांनी वेगाने कारवाई करुन हे हल्ले परतवून लावले. सेनेच्या प्रसारमाध्यमांचे काम पाहणाऱ्या शाखेने म्हटले, की मोहिमे दरम्यान झालेल्या गोळीबारात ९ सैनिक आणि २० दहशतवादी मारले गेले आहेत. (Pakistani Army Killed 20 Terrorist Under Special Campaign)

Pakistan Army
Lata Mangeshkar: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा जीवन प्रवास

बीएलएचा दावा, १७० पाकिस्तानी सैनिक मारले गेले

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) शुक्रवारी दावा केला होता, की तिने बलुचिस्तानमध्ये दोन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये जवळपास १७० पाकिस्तानचे (Pakistan) सैनिकांना मारले आहे. बीएलएने म्हटले, पंजगुर भागात फ्रंटियर कोर कॅम्पला लक्ष्य केले. आता ते त्यांच्या नियंत्रणात आहे. बीएलने म्हटले, मजीद ब्रिगेडच्या आत्मघाती पथकाने पंजगुरमध्ये लष्कराच्या कॅम्पला लक्ष्य केले आणि ते आपल्या नियंत्रणात घेतले. शत्रुचा कॅम्प आताही नियंत्रणात आहे. बीएलएने पाकिस्तानी सेनेवर पंजगुरच्या नागरिकांचे अपहरण आणि हत्येचाही आरोप केला. यापूर्वी मजीद ब्रिगेडच्या एका अन्य शाखेने २० तासांपर्यत नौशकीत सैन्य मुख्यालयाला लक्ष्य केले आणि नियंत्रण मिळविले. त्यात अधिकाऱ्यांसह जवळपास १०० जवानांचा मृत्यू झाला.

Pakistan Army
अमेरिका : न्यूयॉर्कमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड!

२०२१ मध्ये बीएलएने कमीत-कमी १० हल्ले केले

बीएलएन गोरिल्ला हल्ले करण्यासाठी ओळखली जाते. वर्ष २०२१ मध्ये बीएलए कमीत-कमी १० हल्ले केले होते. वर्ष २०२० च्या एक हल्ल्यात बीएलएने पाकिस्तानचे १६ जवानांना ठार केले होते. बीएलए बलुचिस्तानमध्ये अधिक सक्रिय आहे. मात्र पाकिस्तानच्या इतर प्रदेशांमध्येही ती सक्रिय आहे. बीएलएची स्थापना अधिकृतपणे २००० मध्ये झाली आहे. मात्र १९७३ पूर्वीपासूनच स्वातंत्र बलुचिस्तानच्या लढाईत सहभाग राहिलेला आहे. भारत आणि अफगाणिस्तानवर बीएलएला समर्थन करत असल्याचा आरोप पाकिस्तान करत आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()