इस्लामाबाद : पाकिस्तानचे संरक्षणमंत्री परवेझ खट्टक (Pakistan Defence Minister Pervez Khattak) यांनी सियालकोटमध्ये श्रीलंकन नागरिक प्रियंता कुमारा यांची ईश्वरनिंदेच्या नावाखाली जाळून मारल्याच्या घटनेवर निर्लज्ज विधान केले आहे. खटक म्हणतात, मुस्लिम युवकांमध्ये जोश होता. जोश आणि भावनेत येऊन युवा असे नेहमी करुन जातात. युवकांना वाटले की इस्लामवर हल्ला केला गेला आहे. त्याच्या बचावासाठी पुढे यावे. सियालकोटमधील एका कंपनीच्या श्रीलंकन (Sri Lanka) नागरिक असलेल्या व्यवस्थापकाचा काही माथेफिरुंनी ठेचून मारले आणि नंतर मृतदेह जाळून टाकले होते. या घटनेवर पाकिस्तानचे संरक्षणमंत्री खट्टक यांनी सोमवारी (ता.सहा) ट्विटवर पत्रक जारी केले. ते म्हणतात, मी श्रीलंकन नागरिकाच्या हत्येच्या घटनेचा निषेध करतो. पाकिस्तान (Pakistan) प्रत्येक प्रकारच्या कट्टरवादाची निंदा करतो.
श्रीलंकन नागरिकाचे शव सोमवारी कोलंबोत आणण्यात आले. आतापर्यंत २६ मुख्य संशयितांसह एकूण १३१ जणांना अटक करण्यात आली आहे. २६ प्रमुख संशयितांचा लोकांना भडकावणे, कुमारा यांना ठेचून मारणे आणि मृतदेह जाळून टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे ट्विट पाकच्या पंजाब प्रांतातील पोलिसांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.