पाक रिपोर्टर चांद नवाबने पुन्हा चर्चेत; यावेळी उंटावर बसत म्हणाले...

चांद नवाब केवळ पाकिस्तानातच नव्हे तर, भारतातदेखील अतिशय चर्चेत असतात.
Pakistan Reporter Chand Nawab
Pakistan Reporter Chand NawabTweeter
Updated on

कराची : पाकिस्तानी पत्रकार चांद नवाब (Pakistani journalist Chand Nawab) पुन्हा एकदा त्यांच्या हटके स्टाईल रिपोर्टिंगमुळे चर्चेत आले असून, यावेळी कराचीतील धुळीने माखलेल्या थंड वाऱ्यांबद्दल सांगतानाचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान, चांद नवाब केवळ पाकिस्तानातच नव्हे तर, भारतातदेखील अतिशय चर्चेत असतात.

चांद नवाबचा नवा व्हिडिओ व्हायरल

चांद नवाब (Chand Nawab) यांच्या नव्या व्हिडिओमध्ये नवाब कराचीतील धूळयुक्त थंड वाऱ्याच्या अहवाल देताना दिसत आहेत. एवढेच नव्हे तर यामध्ये त्यांनी दुबळ्या लोकांना सतर्क राहण्याचा इशाराही दिला आहे. रिपोर्टिंग दरम्यान चांद नवाब म्हणाले की, 'कराचीचे हवामान खूप आनंददायी आहे आणि थंड वारे वाहत आहेत. हे वादळ पाहण्यासाठी शहरातून लोक येत असून, माझे केस उडत आहेत, माझे तोंड घाण होत आहे आणि मी माझे डोळे उघडू शकत नसल्याचे सांगत, कमकुवत लोकांनी आज समुद्रकिनारी येऊ नये, अन्यथा ते वार्‍याने उडू शकतात, असे नवाब रिपोर्टिंग दरम्यान नागरिकांना सांगतना दिसत आहे. त्यांचा हा मजेशीर रिपोर्टिंगचा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक जण याचा आनंद घेताना दिसून येत आहेत.

Pakistan Reporter Chand Nawab
योगी अयोध्येतून का लढले नाहीत, रामलल्लाच्या मुख्य पुजाऱ्यांचा खुलासा

रिपोर्टिंग दरम्यान चांद यांनी सांगितली मजेशीर गोष्ट

कराचीचे हवामान इतके चांगले आहे की, अशा हवामानाचा आनंद घेण्यासाठी लोकांना मध्यपूर्वेत जाण्याची गरज नाही. व्हिडिओच्या शेवटी, ते उंटावर बसून हवामानाविषयी माहिती देताना दिसत आहेत. दरम्यान, उंटावर बसण्याबाबत नवाब म्हणाले की, 'सध्या मी अरबस्तानच्या कोणत्याही वाळवंटात नसून कराचीच्या समुद्रकिनाऱ्यावर आहे. दुबई आणि सौदी अरेबियासारखे धुळीचे वादळ आज कराचीत अनुभवता येईल, असे यावेळी चांद नवाब नागरिकांना सांगताना दिसून येत होते. दरम्यान, पत्रकार नाइला इनायत यांनी चांद नवाब यांचा हा नवीन व्हिडिओ ट्विट केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.