मुंबई: आज अमुक एका देशात भूकंप आलाय, तमुक एका देशात पूर आलाय, या देशात युद्धात अनेक लोकं मारले गेलेत, त्या देशात डॉक्टरांची गरज आहे अशा सगळ्या ठिकाणी जाणारं भारताचे हवेतील हॉस्पिटल..!
याचा शब्दशः अर्थ हा हवेतील नसला तरी एखाद्या देशात मानवतावादी दृष्टिकोन घेऊन त्यांच्या मदतीला जाण्याचं काम करणारे हॉस्पिटल म्हणजे भारताच्या सशस्त्र सेनचं '६० पॅराशूट फिल्ड हॉस्पिटल'.
कोणत्याही देशात कधीही गरज पडेल तेव्हा जाणे, तेथील भाषा माहिती नसताना तेथील सरकारशी संवाद साधून तेथील अडचणीत सापडलेल्या नागरिकांची मदत करणे, एका हॉस्पिटलमध्ये असतात त्या प्रकारच्या सर्व सुविधा निर्माण करणे हे एक मोठे आव्हान असते...
मात्र वेगवेगळ्या ऑपेरेशनच्या माध्यमातून हवाई किंवा सागरी मार्गाने या सगळ्या गोष्टी एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी हलवून एक तात्पुरतं हॉस्पिटल म्हणजेच '६० पॅराशूट फिल्ड हॉस्पिटल'.
२०२३ साली मेजर बिना तिवारी आणि त्यांच्या टीमने तुर्कीतील लोकांचे प्राण वाचविल्याने त्यांचे तुर्की लोकांसोबतच प्रेमळ क्षण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
आता पुन्हा एकदा हे हॉस्पिटल चर्चेत आले आहे कारण केंद्रीय मंत्रालयाने उत्तर प्रदेशातील '६० पॅराशूट फिल्ड हॉस्पिटल' ची सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार २०२४ साठी निवड केली आहे. आपत्ती व्यवस्थापनातील कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
'सर्वोत्कृष्ट संस्था' या कॅटॅगरीमध्ये १९४२ साली स्थापन झालेल्या या हॉस्पिटलची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
जागतिक पातळीवरील दुर्घटनांदरम्यान हवेत काम करणारे सशस्त्र सैनिक दलाचे हे एकमेव सेवा आहे. या पुरस्काराची घोषणा दरवर्षी २३ जानेवारी रोजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी केली जाते.
केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केल्यानुसार , या हॉस्पिटलचे मुख्य काम हे युद्धजन्य परिस्थिती किंवा शांततेच्या परिस्थितीत देखील नैसर्गिक आपत्ती आल्यास मानवतावादी दृष्टिकोनातून सर्वांना मदत करणे हे आहे.
या हॉस्पिटलने २०१३ च्या उत्तराखंडच्या पूरस्थितीत, नेपाळचा भूकंपात 'ऑपरेशन मैत्री' च्या माध्यमातून, २०१८ मध्ये इंडोनेशिया मधील त्सुनामी दरम्यान 'ऑपरेशन समुद्र मैत्री' च्या माध्यमातून मदत केली आहे.
नुकतेच फेब्रुवारी २०२३ मध्ये या हॉस्पिटलने तुर्की आणि सीरिया येथे झालेल्या ७.८ रिस्टर स्केलच्या भूकंपादरम्यान ९९ जणांची टीम तयार करत या ठिकाणी 'लेव्हल २' ची आरोग्य सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली.
भाषेची मुख्य अडचण असताना देखील या हॉस्पिटलने ३० बेड्चे हॉस्पिटल तेथील शाळांमध्ये उभारले होते.
या माध्यमातून या टीमने रेस्क्यू पासून ते शस्त्रक्रिया, दातांची ट्रीटमेंट, एक्स रे सुविधा, लॅब सुविधा आदी सुविधांसह ३ हजार ६०० रुग्णांना सलग १२ दिवस वैद्यकीय सुविधा प्रदान केली होती. 'ऑपरेशन दोस्ती' या माध्यमातून त्यांनी ही मदत केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबाबत या टीमने केलेल्या या कामासाठी वैयक्तिक पातळीवर तसेच संस्थात्मक पातळीवर हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
संस्था पातळीवर ५१ लाख रुपये आणि प्रमाणपत्र तर व्यक्तिगत पातळीवर ५ लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
२०२४ साली प्रदान केल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी १ जुलै २०२३ या वर्षांपासून ऑनलाईन नामांकने घेण्यात आली होती. यासाठी २४५ नामांकने प्राप्त झाली होती.
------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.