Omicron ! पॅरिसमधील नववर्षाचा प्रसिद्ध 'आतषबाजी' शो रद्द

सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमापूर्वी प्रत्येकाने कोरोना टेस्ट करून घ्यावी.
Paris Fire Works
Paris Fire Works ANI
Updated on

पॅरिस : ओमिक्रॉन विषाणूचा (Omicron Variant) वाढत्या धोक्यामुळे जगभरातील सर्वच देश चिंतेत आहेत. त्यात काही दिवसांवर येऊन ठेपलेला इअर एंड (New Year Celebration ) यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता, नवीन वर्षाच्या स्वगतासाठी पूर्वसंध्येला करण्यात येणारी आतषबाजी रद्द करण्याचा निर्णय पॅरिसमध्ये (Paris cancels New Year fireworks to limit spread of COVID-19) घेण्यात आला आहे. यामुळे दरवर्षी नववर्षाच्या पूर्वसंध्येला चॅम्प्स एलिसीज (Champs Elysees) मार्गावर आतषबाजीचा आनंद लुटण्यास जाणाऱ्या नागरिकांचा या निर्णयामुळे हिरोमोड झाला आहे.

Paris Fire Works
ओमिक्रॉन डेल्टापेक्षा फास्ट, दीड ते तीन दिवसात रूग्णसंख्या दुप्पट - WHO

दरवर्षी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पॅरिसमधील चॅम्प्स एलिसीज (Champs Elysees) मार्गावर नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात आतषबाजीचे (fireworks) आयोजन करण्यात येते. मात्र, कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron) रूग्णांची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून यंदा होणाऱ्या आतषबाजी रद्द करण्याचा निर्णय तेथील प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे.

फ्रान्सचे पंतप्रधान जीन कास्टेक्स (French Prime Minister Jean Castex) यांनी सांगितले की, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला प्रमुख ठिकाणी होणाऱ्या सार्वजनिक पार्ट्या आणि फटाक्यांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी प्रत्येकाने कोरोना टेस्ट (Covid Test) करून घ्यावी, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()