मोठी दुर्घटना! टांझानियातील व्हिक्टोरिया तलावात कोसळलं विमान; 49 प्रवासी अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू

विमानतळापासून सुमारे 100 मीटर अंतरावर प्रिसिजन एअरच्या विमानाला अपघात झाला आहे.
Tanzania Lake Victoria
Tanzania Lake Victoriaesakal
Updated on
Summary

विमानतळापासून सुमारे 100 मीटर अंतरावर प्रिसिजन एअरच्या विमानाला अपघात झाला आहे.

डोडोमा : टांझानियातील व्हिक्टोरिया तलावात (Tanzania Lake Victoria) एक प्रवासी विमान कोसळलं आहे. एएफपी या वृत्तसंस्थेनं पोलिसांच्या हवाल्यानं ही माहिती दिलीय. विमानात किती प्रवासी होते याची माहिती अद्याप मिळालेली नाहीये.

मिळालेल्या माहितीनुसार, टांझानियाच्या कागेरा भागातील बुकोबा येथील व्हिक्टोरिया तलावात विमान कोसळलं आहे. सध्या बचावाचे प्रयत्न सुरू आहेत. हे विमान प्रिसिजन एअरचं आहे. तलावात अनेकांचा बुडून मृत्यू झाल्याचं वृत्त असून विमान तलावात बुडाल्याची छायाचित्रंही समोर येत आहेत.

Tanzania Lake Victoria
Sanjay Patil : काँग्रेस आमदारासह 'हा' नेता भाजपात प्रवेश करणार; माजी आमदारानं फोडला राजकीय बॉम्ब

विमानतळापासून 100 मीटर अंतरावर दुर्घटना

विमानतळापासून सुमारे 100 मीटर अंतरावर एका प्रिसिजन एअरच्या विमानाला अपघात झाला आहे, असं प्रादेशिक पोलिस कमांडर विल्यम मवाम्पघले यांनी बुकोबा विमानतळावर (Bukoba Airport) पत्रकारांना सांगितलं. विमानातील प्रवाशांच्या संख्येबद्दल कोणतीही माहिती तात्काळ मिळाली नाही. परंतु, स्थानिक मीडिया अहवालात म्हटलंय की, आर्थिक राजधानी दार एस सलाम ते लेकसाइड शहरापर्यंतच्या फ्लाइटमध्ये सुमारे 49 लोक होते.

Tanzania Lake Victoria
भारतीय महिलांचा सुरक्षित गुंतवणुकीकडेच का असतो ओढा?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.