व्हेंटिलेटरच्या आवाजाचा त्रास होतो म्हणून एका रुग्णाने आपल्या शेजारच्या रुग्णाचा व्हेंटिलेटरच बंद केला आहे. एका ७२ वर्षीय महिलेने हा प्रकार केला आहे. या महिलेला गुन्हेगारी पार्श्वभूमीही आहे. तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
जर्मनीमधल्या एका रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. या ७२ वर्षीय महिलेला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली मॅनहॅटन शहरामधून ताब्यात घेण्यात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने दुसऱ्या रुग्ण महिलेचा व्हेंटिलेटर दोन वेळा बंद केला. पहिल्यांदा बंद केल्यावर रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी तिला दटावलं आणि हे मशीन महत्त्वाचं असल्याचं समजावून सांगितलं.
हेही वाचा - आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....
पण काही वेळानंतर पुन्हा एकदा या महिलेने व्हेंटिलेटर बंद केला. या मशीनमधून येणाऱ्या आवाजामुळे आपल्याला त्रास होत असल्याने आपण व्हेंटिलेटर बंद केल्याचं या महिलेने सांगितलं. या प्रकारामुळे त्या ७९ वर्षीय रुग्णाचा जीव धोक्यात आला होता. मात्र, आता हा धोका टळला आहे. तरी या रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.