आता खैर नाही! बलात्काऱ्यांना 'या' देशात बनवलं जाणार नपुंसक

Peru President Pedro Castillo
Peru President Pedro Castilloesakal
Updated on
Summary

जगातील बहुतांश देशांमध्ये बलात्काराबाबत अतिशय कठोर नियम बनवले गेले आहेत.

पेरू : जगातील बहुतांश देशांमध्ये बलात्काराबाबत अतिशय कठोर नियम बनवले गेले आहेत. अनेक देशांमध्ये बलात्काराच्या दोषींना शिक्षेबाबत अजूनही चर्चा सुरूय. दरम्यान, पेरूच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या एका विधानानं जगभरात खळबळ उडवून दिलीय. बलात्काराच्या दोषींना नपुंसक बनवण्यात येणार असून त्यासाठी रसायनांचा वापर करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केलीय.

बलात्काऱ्यांना वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या शिक्षा दिल्या जातात. इतकंच काय तर काही देशात मृत्यूदंडही दिला जातो. अशात आता पेरू देशात एक असं विधेयक तयार केलं जात आहे, ज्याबाबत वाचून गुन्हेगारांना धडकी भरेल. या कायद्यानुसार बलात्कार करणाऱ्या लोकांना नपुंसक केलं जाईल. पेरूचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो कॅस्टिलो (Pedro Castillo) यांनी ही घोषणा केलीय. कॅस्टिलो यांनी एका 3 वर्षाच्या मुलीच्या केसचा उल्लेख केला. ज्यामुळं देशात मोठा आक्रोश निर्माण झाला होता. बलात्काऱ्यांना नपुसंक बनवण्यासाठी केमिकल औषधांचा वापर केला जाईल. पेरू हा पहिला देश नाहीये जिथं अशाप्रकारची शिक्षा सुरू होत आहे. पेरूआधी अशाप्रकारच्या शिक्षेचं प्रावधान दक्षिण कोरिया, पोलॅंड, चेक गणराज्य आणि संयुक्त राज्य अमेरिकेच्या काही राज्यांमध्ये लागू आहे.

Peru President Pedro Castillo
जहांगीरपुरीसारखा हिंसाचार कसा थांबवायचा? किरण बेदींनी सांगितला उपाय

कॅस्टिलो पुढं म्हणाले, येणाऱ्या काही दिवसांत हा प्रस्तावर औपचारिकपणे दिला जाईल आणि ते कॉंग्रेसच्या समर्थनाची वाट बघत आहे. ज्यानंतर हे विधेयक पास करण्यासाठी पाठवलं जाईल. कायदेमंत्री फेलिक्स चेरो (Félix Chero) म्हणाले की, शिक्षा आणि मानसिक आरोग्यात उपाय म्हणून केमिकल कॅस्ट्रेशन प्रस्तावित केलं जाईल. सध्या पेरूमध्ये बलात्काऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली जाते, तरीही ३५ वर्ष तुरूंगात राहिल्यानंतर कैद्याच्या शिक्षेची समीक्षा केली जाऊ शकते. पेरू लिब्रेच्या कॉंग्रेस (Congress) महिला आणि कॉंग्रेस महिला आयोगाच्या अध्यक्षा एलिजाबेथ मदीना यांनी प्रस्तावाला समर्थन दिलंय. सध्या पेरूच्या राष्ट्राध्यक्षांनी हा प्रस्ताव पुढं करून पेरूमध्ये एका नव्या वादाला जन्म दिलाय. काही लोक याच्या समर्थनात आहेत, तर काही तज्ज्ञांना अजूनही यावर चर्चा करण्याची गरज वाटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.