Good News! 'अमेरिकेत कोरोना लसीकरण कार्यक्रम डिसेंबरपासून सुरु होऊ शकतो'

pfizer vaccine
pfizer vaccine
Updated on

वॉशिंग्टन: कोरोनाचा प्रभाव संपूर्ण जगभर वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. तसेच अमेरिकेतही कोरोना महामारीने कहर केला आहे. सर्वजण सध्या कोरोनाची लस कधी येईल यावर नजर ठेऊन आहेत. रविवारी अमेरिकेतून कोरोना लसीबद्दल एक चांगली बातमी आली आहे. व्हाइट हाउसकडून सांगितलं गेलं आहे की, येत्या 11 किंवा 12 डिसेंबरपासून कोरोनावर (Covid-19) लसीकरण सुरु केलं जाऊ शकतं.

शुक्रवारी अमेरिकन औषधनिर्मित्ती कंपनी फायजर आणि तिची सहकारी कंपनी जर्मनीची बायोएनटेक (pfizer and biontech vaccine) यांनी तयार केलेल्या कोरोवरील लस वापरासंबंधी Food and Drug Administration (FDA)कडे परवानगी मागितली होती. यासंबंधी FDA ची येणाऱ्या 10 डिसेंबरला बैठक होणार आहे. यावर कोरोना लसीकरण कार्यक्रमाचे प्रमुख अमेरिकेन डॉक्टर मोनसेफ स्लाउ यांनी सांगितले की, लसीकरणाचे काम मंजुरी मिळाल्यानंतर 24 तासांच्या आत सुरु केलं जाईल, तसेच मंजुरी मिळाल्यानंतर दोन दिवसांत 11 किंवा 12 डिसेंबरला हा कार्यक्रम सुरु केला जाईल.

अमेरिकेत कोरोचा सर्वाधिक कहर-
जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटीच्या आकडेवारीनुसार अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा 1 कोटी 20 लाखांच्या वर गेला आहे. तसेच या महामारीने अमेरिकेत आतापर्यंत 2 लाख 55 हजार पेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मोनसेफ स्लाउ यांनी एफडीएकडून परवानगी मिळाली तर लगेच लसीकरण सुरु केलं जाईल असं सांगितले आहे.

फायझरची कोरोनावरील लस-
ही लस तयार करण्यासाठी फायझर या अमेरिकी औषध कंपनीने जर्मनीतील बायोएनटेकशी हातमिळवणी केली आहे. काही दिवसांपुर्वी फायझरने फेज 3 चाचण्यांचे अंतरिम निष्कर्ष समोर आले होते. त्यामध्ये ही लस 95 टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचे आढळून आले आहे.

अँटिबॉडी थेरपीला मान्यता-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कोरोनावरील उपचारासाठी दिल्या गेलेल्या सिंथेटिक एँटीबॉडी थेरपीचा वापर आता सार्वजनिकरित्या करण्याचा आपत्कालिन निर्णय अमेरिकेच्या प्रशासनाने घेतला आहे. शनिवारी घेतल्या गेलेल्या या निर्णयानंतर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती न करताच कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा उपचार आता शक्य होईल. अमेरिकेच्या फूड एँड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशनचे कमिश्नर स्टीफन हान यांनी म्हटलं की, या मोनोक्लॉनल एँटीबॉडी थेरपीला अधिकृत करण्यामुळे रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती न करताच उपचार शक्य होईल. यामुळे आमच्यावरील ताण कमी होईल.

  (edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.