Pfizer-BioNTech कंपन्यांवर सायबर हल्ला; कोरोना लशीसंदर्भातले डॉक्यूमेंट्स हॅक

corona vaccine
corona vaccine
Updated on

बर्लिन : जर्मन कंपनी बायोनटेक आणि अमेरिकेची औषध कंपनी फायझरच्या कोरोना व्हायरस लशीचा डेटा चोरला गेल्याची माहिती समोर आलीय. युरोपियन मेडिसिन एजन्सीच्या सर्व्हरवर सायबर हल्ल्यादरम्यान अवैधरित्या हा डेटा मिळवला गेलाय. कंपनीने स्वत: याची माहिती दिली आहे. एम्स्टर्डमच्या एजन्सीने आपल्या कोरोना व्हायरस लशीच्या वापरला युरोपीय संघाच्या मेडिसिन रेग्यूलेटरकडे आवाहन केलं आहे. कंपनीने बुधवारी म्हटलं की त्यांच्या कंपनीवर सायबर हल्ला झाला आहे.

इएमएने हल्ल्याची माहिती देण्यास नकार दिला आणि या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दोन्ही कंपन्यांनी नंतर एक वक्तव्य जाहीर केलं आणि म्हटलं की, इएमए सर्व्हरवर स्टोर फायझर आणि बायोनटेकची कोरोना लस, बीएनटी 162 बी 2 शी संबंधित काही दस्ताऐवज अवैधरित्या एक्सेस केले गेले आहेत. त्यांनी पुढे म्हटलंय की, अद्याप या गोष्टीची माहिती मिळाली नाहीये की, डेटा एक्सेस झाल्यानंतर आमच्या अभ्यासात समाविष्ट लोकांची ओळख चोरली गेलीय का? याबाबत माहिती नाही.

कंपनीने म्हटलंय की, याक्षणी आम्ही इएमएचा तपासासंदर्भात आणखी माहिती मिळण्याची वाट पाहत आहोत. योग्यवेळी युरोपीय संघाच्या कायद्यानुसार आम्ही यावर प्रतिक्रिया देऊ. फायझर आणि बायोनटेक यांनी बनवलेल्या लशीला मागच्याच आठवड्यात ब्रिटन तर बुधवारी कॅनडामध्ये आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.