कोरोना लसीची क्षमता कालांतराने होते कमी; कंपन्यांच्या दाव्याने चिंता वाढली

मॉडर्ना आणि फायजर या कंपन्यांनी हा दावा केला आहे.
PFizer
PFizerTeam eSakal
Updated on

कोरोना विषाणुच्या साथीविरुद्ध लढण्यासाठी कोरोना लस महत्वाची ठरते आहे. त्यामुळेच देशासह जगभरात लसीकरणावर भर दिला जातो आहे. मात्र आता मॉडर्ना (Moderna Vaccine) आणि फायजर (Pfizer Vaccine) लस तयार करणाऱ्या कंपन्यांनी केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा लसी संदर्भातील चिंता वाढल्याचे दिसते आहे. अमेरिकेचे औषध प्रशासन (US drug regulator) मंडळ कोरोना लसीच्या बुस्टर डोसला परवानगी द्यावी की, नाही यावर विचार करत असतानाच या कंपन्यांनी लसीच्या क्षमतेबद्दल नवीन माहिती दिली.

बूस्टर डोसच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी अमेरीकेच्या औषध प्रशासनाच्या सल्लागार समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीच्या आधीच, फायझरने कैसर पर्मनंट साउथर्न कॅलिफोर्नियाचा (Kaiser Permanente Southern California) एक अहवाल सादर केला. या अहवालानुसार विषाणुच्या व्हॅरियंटमध्ये होणाऱ्या बदलांमुळे, लसीची कार्यक्षमता कमी होऊ शकते. दुसऱ्या डोसनंतर असलेला लसीचा प्रभाव सहा ते आठ महिन्यांनी कसा कमी होतो, याची तपशीलवार माहिती फायझरने दिली. त्यानुसार दुसऱ्या डोसनंतर दर दोन महिन्यांनी लसीचा प्रभाव सुमारे 6% कमी झाल्याचे दिसून आले.

PFizer
कोंबडीच्या रक्तानं पिढी घडवण्याचा 'चीनी प्रयोग'

फायजरने सादर केलेल्या आकडेवारीनुसार लसीकरणानंतरच्या पहिल्या आठवड्यात 96.2% असणारी लसीची परिणामकारकता चार महिन्यांनंतर 83.7% वर आली. तर मॉडर्नाने देखील देखील याबद्दल माहिती देताना, लसीची परिणामकारकता कालांतराने कमी होते असे सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()