जागतिक तसेच भारतीय बाजारपेठेत लसीच्या तुटवड्याबाबत गेल्या आठवड्यात कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. यावेळी पररराष्ट्र मंत्रालय, नीति आयोग, जैव प्रौद्योगिकी विभाग, गृह मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते.
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या फायझरने (Pfizer) यावर्षी कोरोना लसीचे ५ कोटी डोस देण्यास तयारी दर्शवली आहे. पण यासाठी काही अटीही ठेवल्या आहेत. एक कोटी डोस जुलैमध्ये, एक कोटी ऑगस्टमध्ये, सप्टेंबर महिन्यात दोन कोटी तर ऑक्टेबरमध्ये पुन्हा राहिलेले एक कोटी डोस देण्यास फायझर तयार आहे. जगभरात फायझरच्या १४.७ कोटी डोसचे वाटप करण्यात आलं आहे. आणि आतापर्यंत या लसीचे कोणतेही दुष्परिणाम समोर आलेले नाहीत. ()
फायझरच्या अटी -
१. फक्त भारत सरकारसोबत कंपनी चर्चा करेल. तसेच भारत सरकारलाच डोसचे पैसे फायझर इंडियाला द्यावे लागतील.
२. खरेदी केलेल्या डोसचे वितरण स्वत: भारत सरकारला करावे लागेल.
३. लस मिळविण्यासाठी भारत सरकारला नुकसानभरपाईचा एक करार करावा लागेल. यासाठी फायझर कंपनीने आवश्यक कागदपत्रेही पाठवली आहेत.
४. अमेरिकेसहित ११६ देशांशी अशा प्रकारचा करार करण्यात आल्याचे फायझरचे म्हणणे आहे.
दरम्यान, मॉडर्नाच्या लसी पुढील वर्षी भारतात दाखल होतील, अशी शक्यता आहे. त्यासाठी सिप्ला आणि अन्य भारतीय कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. दुसरीकडे जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीकडून या वर्षी कोरोना लसीचे डोस उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. जागतिक तसेच भारतीय बाजारपेठेत लसीच्या तुटवड्याबाबत गेल्या आठवड्यात कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. यावेळी पररराष्ट्र मंत्रालय, नीति आयोग, जैव प्रौद्योगिकी विभाग, गृह मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. सध्या नागरिकांना कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचे डोस देण्यात येत आहेत. आतापर्यंत २० कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. रशियाची स्पुतनिक व्ही या लसीला भारत सरकारने मंजुरी दिली आहे. मात्र, या लसीचे डोस कमी प्रमाणात उपलब्ध आहेत.
जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.