भारतीय वैमानिकांची कमाल, ब्रिटनमधील वादळातून काढली वाट; VIDEO व्हायरल

शानदार, जबरदस्त, जिंदाबाद भारतीय वैंमानिकांवर जगभरातून कौतूकाचा वर्षाव
भारतीय वैमानिकांची कमाल, ब्रिटनमधील वादळातून काढली वाट; VIDEO व्हायरल
Updated on

ब्रिटन सध्या गेल्या तीस वर्षांतील सर्वात मोठ्या वादळाचा सामना करत आहे. जेव्हापासून Eunice वादळ ब्रिटनमध्ये (Britain) धडकलं, तेव्हापासून ब्रिटनध्ये हवामानात मोठे बदल झाले आहेत. परिणामी हवाई वाहतुकही (Air Traffic) विस्कळीत झालेली दिसतेय. लंडनमधील (London) हिथ्रो विमानतळावरही हीच परिस्थिती आहे. या ठिकाणी विमानांचं लँडिंग करणंही कठीण झालं आहे. जोरदार वाऱ्यामुळे विमानं अडकून पडली आहेत. मात्र एवढी मोठी आव्हानं असतानाही एका भारतीय पायलटच्या (Indian Pilot) कुशलतापुर्वक विमान चालवण्याचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होतंय. या वादळात विमान उतरवण्याचा हा थरारक व्हिडिओ (Viral Video) सोशल मिडियावर व्हायरल होतोय.

भारतीय वैमानिकांची कमाल, ब्रिटनमधील वादळातून काढली वाट; VIDEO व्हायरल
युक्रेनवर कधीही हल्ला होऊ शकतो : ज्यो बायडेन
भारतीय वैमानिकांची कमाल, ब्रिटनमधील वादळातून काढली वाट; VIDEO व्हायरल
जगातील सर्वात भयानक 7 रेस्तराँ, जिथे जायला लोक घाबरतात!

ब्रिटनमध्ये आलेल्या या धोकादायक Eunice वादळात एअर इंडियाच्या विमानाने एवढं कुशलापुर्वक लँडिंग केल्यानं, प्रत्येकजण त्या विमानाच्या वैमानिकांचं कौतुक करताना दिसतोय. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्येही 'बिग जेट टीव्ही'चे संस्थापक जेरी डायर्स म्हणता आहेत की, "हे विमान योग्यरित्या उतरू शकेल की नाही हे आपल्याला पाहायचंय!" त्यावरून या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येतंय. मात्र विमान लँड झाल्यानंतर हे अत्यंत कुशल भारतीय वैमानिक असल्याचं म्हणत सर्वांकडूनच कौतूक होतंय.

भारतीय वैमानिकांची कमाल, ब्रिटनमधील वादळातून काढली वाट; VIDEO व्हायरल
Ukraine Russia crisis: युक्रेनमधील स्फोटावरून रशियाची भूमिका संशयास्पद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.