भारतासाठी योग्य तेच नेहरूंनी केले - पेन्पा त्सेरिंग

तिबेटवरील चीनच्या वर्चस्वावरून पेन्पा त्सेरिंग यांचे मत
PM Jawaharlal Nehrudid the right thing for India Penpa Tsering Washington
PM Jawaharlal Nehrudid the right thing for India Penpa Tsering Washingtonsakal
Updated on

वॉशिंग्टन : ‘तिबेटवर चीनचा अधिकार मान्य करून भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी फार मोठी चूक केली, असे भारतात अनेक जणांना वाटत असले तरी त्यावेळी भारतासाठी जे योग्य होते तेच त्यांनी केले,’ असे मत तिबेटच्या विजनवासातील सरकारचे अध्यक्ष पेन्पा त्सेरिंग यांनी आज व्यक्त केले. पेन्पा त्सेरिंग हे अमेरिका सरकारमधील वरीष्ठ अधिकाऱ्यांची आणि काही लोकप्रतिनिधींची भेट घेण्यासाठी वॉशिंग्टन येथे आले आहेत. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना त्सेरिंग म्हणाले की,‘‘तिबेटबाबतचा निर्णय घेण्यामागे नेहरूंचा स्वत:चा वेगळा दृष्टीकोन होता.

त्यांनी चीनवर अतिप्रचंड विश्‍वास ठेवला होता. त्यामुळे मी फक्त पंडित नेहरूंना जबाबदार ठरवत नाही. प्रत्येक देशाला आधी स्वहित पाहणे आवश्‍यक असते, हे आम्ही समजू शकतो. नेहरूंनी त्यावेळी जे केले, ते त्यांच्या दृष्टीने भारतासाठी सर्वाधिक योग्य होते.’’ तसेच, केवळ भारतच नाही तर इतर अनेक देशांनी तिबेटवरील चीनचे अधिपत्य मान्य केले असल्याचे त्सेरिंग यांनी निदर्शनास आणून दिले. ‘इतिहासातील घटनांचा आढावा घेताना अनेकांना नेहरूंनी फार मोठी चूक केल्याचे वाटते. वास्तविक, त्यांची चीनवर इतका विश्‍वास ठेवला होता की चीनने १९६२ मध्ये ज्यावेळी भारतात सैन्य घुसविले त्याचा त्यांना फार मोठा धक्का बसला. त्यांचा मृत्यू होण्यामागे हेही एक कारण असू शकते,’ असेही मत त्यांनी व्यक्त केले.

२०१४ नंतर बदल

भारताने २०१४ नंतर आपली भूमिका बदलली आहे, असा अंदाज पेन्पा त्सेरिंग यांनी व्यक्त केला. ‘तिबेट हा चीनचा भाग आहे, असे भारत आता वारंवार जाहीर करत नाही. कारण भारताने जर ‘वन चायना’ धोरण मान्य केले, तर चीनलाही काश्‍मीरबाबत ‘अखंड भारत’ हे धोरण मान्य करावे लागेल, अशी भारताची भूमिका आहे,’ असे त्सेरिंग म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.