H-1B Visa : मोदी यांची व्हिसाबाबत घोषणा; ‘एच-वन बी’चे नूतनीकरण अमेरिकेतच

प्रवासी भारतीयांमध्ये पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल आस्था असल्याचे दिसले
PM Modi announcement on visas Renewal ofH-1B visa  in America itself
PM Modi announcement on visas Renewal ofH-1B visa in America itselfsakal
Updated on

वॉशिंग्टन : ‘‘भारत आणि अमेरिकेमधील संबंधांचा एक नवा आणि गौरवशाली अध्याय सुरू झाला आहे,’’ असे अमेरिकेच्या पहिल्या सरकारी दौऱ्याचे फलित सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसाठी ‘एच-वन बी’ व्हिसाबाबत दिलासादायक घोषणा केली. ‘‘एच-वन बी’ व्हिसाचे नूतनीकरण करण्यासाठी तुम्हाला अमेरिकेबाहेर जावे लागणार नाही. अमेरिकेत राहूनच या व्हिसाचे नूतनीकरण करता येणार आहे,’’ असे मोदी यांनी सांगितले.

‘रोनाल्ड रेगन बिल्डिंग अँड इंटरनॅशनल ट्रेड सेंटर’ येथे मोदी यांनी ‘भारताच्या विकासात प्रवासी भारतीयांची भूमिका’ या विषयावर अमेरिकेतील भारतीय समुदायाला संबोधित केले. मोदी यांनी चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी भारतीय समुदायाची संवाद साधला. येथील प्रवासी भारतीयांमध्ये पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल आस्था असल्याचे दिसले.

त्यांच्यातील उत्साह व उपस्थिती पाहून मोदी म्हणाले, ‘‘या सभागृहात भारताचा संपूर्ण नकाशा तयार झाल्याचे आज मला दिसत आहे. भारताच्या काना-कोपऱ्यातून आलेले नागरिक मला येथे दिसत आहेत. तुम्हा सर्वांना पाहून असे वाटते की येथे ‘मिनी इंडिया’ तयार झाला आहे. भारत आणि अमेरिका संयुक्तपणे केवळ धोरणे आणि करार करीत नाही तर आम्ही मिळून जीवन, स्वप्ने आणि नियतीला एक आकार देत आहोत. अमेरिकेत ‘एक भारत श्रेष्ठ भारता’ची एवढे सुंदर चित्र दाखविल्याबद्दल तुमच्या सर्वांना मी धन्यवाद देतो.’’

निर्णयाचे जोरदार स्वागत

भारतीय वंशांच्या अमेरिकी नागरिकांसाठी महत्त्वाचा असणाऱ्या ‘एच-वन बी’ व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न म्हणून या व्हिसाचे नूतनीकरण अमेरिकेतच करता येणार असल्याची घोषणा करीत मोदींनी मोठी खूशखबर दिली. ‘एच-वन बी’ व्हिसाचे नूतनीकरण करण्यासाठी तुम्हाला अमेरिकेबाहेर जावे लागणार नाही.

अमेरिकेत राहूनच ते करता येणार आहे, असा निर्णय झाला आहे. हा नवा निर्णय माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांना अत्यंत लाभदायी ठरणार आहे, असे सांगत याचा पथदर्शी प्रकल्‍प पुढील वर्षी सुरू होणार असल्याची माहिती मोदी यांनी यावेळी दिली. भारत यंदा सिएटल आणि अमेरिकेतील अन्य दोन देशांत नवा वाणिज्य दूतावास सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

PM Modi announcement on visas Renewal ofH-1B visa  in America itself
Car Driving Tips : A एक्सीलेटर, B ब्रेक, C क्लच, D कशासाठी? कारची ABCD शिकून घ्या

संरक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचा निर्णय

‘‘भारत आणि अमेरिकेमधील संबंधांचा एक नवा आणि गौरवशाली अध्याय सुरू झाला आहे. हा दौरा म्हणजे ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’साठी महत्त्वपूर्ण भागीदारीची ही सुरुवात आहे. तंत्रज्ञान हस्तांतर असो वा उत्पादनातील सहकार्य किंवा औद्योगिक पुरवठा साखळीतील समन्वय वाढविण्याची बाब असो, दोन्ही देश उज्ज्वल भविष्याच्या दिशेने एकत्र पुढे जात आहेत. भारतात लढाऊ विमाने आणि त्याची इंजिन भारतात उत्पादित करण्याचा जनरल इलेक्ट्रिक कंपनीचा निर्णय भारताच्या संरक्षण क्षेत्रात एक मैलाचा दगड ठरणार आहे,’’ असा विश्‍वास मोदींनी व्यक्त केला.

PM Modi announcement on visas Renewal ofH-1B visa  in America itself
H1-B visa : एचवन-बी व्हिसाचा ‘ग्रेस पिरीयड’ वाढविणार?

मोदी म्हणाले...

  • संरक्षण आणि औद्योगिक सहकार्याने भारत व अमेरिकेतील मैत्री व भागीदारी बळकट होईल

  • माझ्या दौऱ्यात गुगल, मायक्रोन, अप्लाईड मटेरिअल्स आणि अन्य कंपन्यांकडून भारतात भक्कम गुंतवणूक करण्याची घोषणा

  • या गुंतवणुकीमुळे भारतात रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होईल

  • भारत आणि अमेरिकेमध्ये झालेल्या अर्टिमिस करारामुळे अवकाश संशोधनात अनेक संधी खुल्या होणार असल्यानेच मी म्हटले होते, की ‘स्काय इज नो लिमिट’

  • भारताच्या प्रत्येक यशाने तुम्ही (भारतीय अमेरिकी) खूष होता

  • ‘योग दिना यूएन’च्या मुख्‍यालयात जगभरातील लोक एवढ्या मोठ्या संख्‍येने एकत्र आल्याचा तुम्हाला अभिमान वाटतो

  • तुमच्या येथील सुपरमार्केटमध्ये ‘मेड इन इंडिया’ वस्तू पाहता, नामांकित भारतीय कंपन्या नेतृत्व करताना आणि जेव्हा सर्व जग ‘नाटू-नाटू’ गाण्यावर थिरकते, तेव्हा तुमचा ऊर अभिमान भरून येतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.