पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजीचा सर्वोच्च सन्मान जाहीर झाला आहे. फिजीचे पंतप्रधान सितवानी राबुका यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींना सर्वोच्च नागरी सन्मान: कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजीने सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आजपर्यंत केवळ मोजक्याच गैर-फिजीयनांना हा सन्मान मिळाला आहे.(PM Modi Bestowed With Fiji's Highest Honour 'Companion Of The Order Of Fiji )
हा सन्मान फक्त माझा नाही तर 140 कोटी भारतीयांचा आहे, शतकानुशतके भारत-फिजी संबंधांचा आहे..." अशी भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.
रिपब्लिक ऑफ पलाऊने इबाकल पुरस्कार दिला. हे दोन्ही पुरस्कार पंतप्रधान मोदींना पापुआ न्यू गिनीमध्येच देण्यात आले आहेत. पीएमओ इंडियाने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे.
पॅसिफिक बेटांच्या देशांच्या एकतेच्या कारणासाठी आणि ग्लोबल साउथच्या कार्याचे नेतृत्व केल्याबद्दल पापुआ न्यू गिनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पापुआ न्यू गिनीतील फार कमी अनिवासींना हा पुरस्कार मिळाला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.