युक्रेननं रशियाला जशासतसं उत्तर दिलं आणि अजूनही युक्रेन प्रतिकार करत आहे.
Ukraine Russia War : रशिया-युक्रेनच्या युध्दाला आता अकरा महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटाला आहे. 24 फेब्रुवारी 2022 रोजी सुरु झालेलं युद्ध अजूनही सुरु आहे. खरंतर रशियासारख्या बलाढ्य देशासमोर युक्रेनचा पाडाव होईल, असा अंदाज अनेकांनी बाधला. पण, तसं झालं नाही.
युक्रेननं रशियाला जशासतसं उत्तर दिलं आणि अजूनही युक्रेन प्रतिकार करत आहे. हे सगळं सुरु असतानाच एका प्रसिद्ध फ्रेंच पत्रकारानं एक मोठं विधान केलंय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे अशा प्रकारचे व्यक्ती आहेत, जे दोन देशांत सुलभ चर्चा घडवून महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. रशियामध्ये पंतप्रधान मोदींची प्रतिमा चांगली आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी पीएम मोदी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी बोलू शकतात, असं फ्रेंच पत्रकारानं म्हटलंय.
पत्रकार लॉरा हेम (Journalist Laura Haim) यांनी सांगितलं की, 'सध्या परिस्थिती अत्यंत कठीण दिसत आहे. कारण, युक्रेन चर्चा करू इच्छित नाहीये आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयनंही (ICJ) पुढाकार घेण्यास तयार नाहीये, त्यामुळं हे युध्द दीर्घकाळ चालणार असं दिसतंय. अमेरिकेतील लोक रशिया-युक्रेन युद्धावर बोलत नाहीत, हे पाहून आश्चर्य वाटतं.'
युक्रेनमध्ये सुरु असलेलं युद्ध दीर्घकाळ चालणार आहे. युक्रेनमध्ये काय होणार आहे हे कोणालाही माहिती नाही. रशिया कदाचित, एक नवीन जमवाजमव करण्याचा प्रयत्न करणार आहे. रशियाला कीववर अधिक हल्ले करायचे आहेत. मात्र, युक्रेनियन लोक खूपच धाडसी आहेत, त्यांचं कौतुक करायला हवं, असंही फ्रेंच पत्रकारानं म्हटलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.