PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; फ्रान्सने सर्वोच्च पुरस्काराने केले सन्मानित

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत
PM Modi France Visit
PM Modi France VisitEsakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. भारतीय समुदायाला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान मोदी रात्रीच्या जेवणासाठी एलिसी पॅलेसमध्ये पोहोचले. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन आणि फ्रेंच फर्स्ट लेडी ब्रिजिट मॅक्रॉन यांनी येथे त्यांचे स्वागत केले. मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींसाठी एका खासगी डिनरचे आयोजन केले होते. यावेळी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनरने सन्मानित केले आहे.(Latest Marathi News)

PM Modi France Visit
Narendra Modi : फ्रान्समध्ये मोदींचे जंगी स्वागत; ‘बॅस्टिल डे’ संचलनाला राहणार उपस्थित

मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या डिनरवर पंतप्रधान मोदींनी आनंद व्यक्त केला. एलिसी पॅलेसमध्ये खाजगी डिनर आयोजित केल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि फर्स्ट लेडीचा आभारी आहे, असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.(Latest Marathi News)

PM Modi France Visit
Narendra Modi : फ्रान्समध्ये मोदींचे जंगी स्वागत; ‘बॅस्टिल डे’ संचलनाला राहणार उपस्थित

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट केले की, राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर देऊन सन्मानित केले आहे. हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.

पंतप्रधानांनी परदेशी भारतीयांना केले संबोधित

तत्पूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समधील भारतीय समुदायाला संबोधित केले. यावेळी त्यांनी विकसित भारताचे स्वप्न सांगितले. ते म्हणाले की, भारत पुढील 25 वर्षांत विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत सामील होऊ शकतो. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी राष्ट्रपती महात्मा गांधींपासून ते भारतीय संत तिरुवल्लुवर यांचे स्मरण केले आहे. चांद्रयान-3, UPI आणि गरिबी निर्मूलनाच्या क्षेत्रातील भारताच्या कामगिरीचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला आहे.(Latest Marathi News)

फ्रान्समध्ये केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी केलेल्या घोषणा

फ्रान्समध्ये संत तिरुवल्लुवर यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे.

फ्रान्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना 5 वर्षांचा दीर्घकालीन स्टडी पोस्ट व्हिसा दिला जाईल.

भारत सरकारने फ्रान्स सरकारच्या मदतीने मार्सेलमध्ये नवीन वाणिज्य दूतावास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

PM Modi France Visit
India Poverty : गरीबी कमी करण्यात भारताला यश; ‘यूएनडीपी’चा अहवाल

व्यावसायिक संबंध वाढवण्यावर भर

भारत आणि फ्रान्समध्ये धोरणात्मक संबंध असूनही, दोघांमधील व्यावसायिक संबंध फारसे उत्साहवर्धक नाहीत. 2010 ते 2021 पर्यंत दोन्ही देशांच्या द्विपक्षीय व्यापारात सुमारे 4 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर दोन्ही देशांचे सामरिक हितसंबंध आहेत, या संदर्भात आता व्यावसायिक संबंध वाढवण्यावर दोन्ही देशांचा भर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()