PM Modi: पुन्हा मैत्रीचा हात केला पुढे! पंतप्रधान मोदींनी शाहबाज शरीफ यांचे पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल केले अभिनंदन

PM Modi: शाहबाज शरीफ यांनी सोमवारी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. 2022 नंतर ते दुसऱ्यांदा देशाची सूत्रे हाती घेतील. देश आर्थिक संकटाचा सामना करत असताना शाहबाज यांनी दुसऱ्यांदा पाकिस्तानची सूत्रे हाती घेतली आहेत.
pm modi and pm shahbaj sharif
pm modi and pm shahbaj sharifEsakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी भारताच्या वतीने पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे केला आणि X वर शाहबाज शरीफ यांना अभिनंदनाचा संदेश पाठवला आहे. पीएम मोदींनी लिहिले, "पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याबद्दल शाहबाज शरीफ यांचे अभिनंदन."

शाहबाज शरीफ यांनी सोमवारी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. 2022 नंतर ते दुसऱ्यांदा देशाची सूत्रे हाती घेतील. देश आर्थिक संकटाचा सामना करत असताना शाहबाज यांनी दुसऱ्यांदा पाकिस्तानची सूत्रे हाती घेतली आहेत. राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी राष्ट्रपती भवन ‘ऐवान-ए-सदर’ येथे आयोजित समारंभात ७२ वर्षीय शाहबाज यांना पदाची शपथ दिली.

pm modi and pm shahbaj sharif
Lebanon Attack on Israel: हमास पाठोपाठ लेबनॉनचाही इस्राइलवर हल्ला! एका भारतीयाचा मृत्यू, तर दोन जण जखमी

संसद विसर्जित होण्यापूर्वी शाहबाज शरीफ यांनी एप्रिल 2022 ते ऑगस्ट 2023 पर्यंत आघाडी सरकारचे पंतप्रधान म्हणून काम केले होते. आता सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यांची पीएमएल-एन आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांनी युती केली. या आघाडीकडून संयुक्त उमेदवार म्हणून शाहबाज शरीफ (७२) यांचे नाव पुढे करण्यात आले होते. 336 सदस्यांच्या सभागृहात युतीला 201 मते मिळाली होती, जी सभागृह नेता होण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांपेक्षा 32 अधिक आहे.

pm modi and pm shahbaj sharif
Israel-Hamas War: गाझामध्येही हमासने ओलिसांवर केले बलात्कार अन् हत्या...; संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक खुलासा

त्याचवेळी त्यांचे प्रतिस्पर्धी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या तुरुंगात असलेल्या ओमर अयुब खान यांना 92 मते मिळाली. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष सरदार अय्याज सादिक यांनी निकाल जाहीर करताना शेहबाज यांची पाकिस्तानचे २४ वे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली.

pm modi and pm shahbaj sharif
Google Gemini Row : गुगलच्या दिलगिरीनंतर काय म्हणाले राजीव चंद्रशेखर? 'जेमिनी'मध्ये नेमक्या काय त्रुटी? जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.