PM Modi France Visit
PM Modi France VisiteSakal

PM Modi France Visit : पंतप्रधान मोदींच्या फ्रान्स दौऱ्यामधून देशाला काय मिळालं? पाहा ठळक मुद्दे

फ्रान्सच्या बॅस्टिल डे परेडला प्रमुख पाहुणे म्हणून PM मोदींना आमंत्रित करण्यात आलं होतं.
Published on

पंतप्रधान मोदी हे १३ आणि १४ तारखेला फ्रान्स दौऱ्यावर होते. फ्रान्सच्या बॅस्टिल डे परेडला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यामध्ये बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली.

या दौऱ्यामध्ये भारत-फ्रान्स संबंध आणखी मजबूत झाले. तसंच, यावेळी दोन्ही देशांमध्ये ग्रीन हायड्रोजन, अक्षय्य उर्जा, एआय, सेमीकंडक्टर्स, सुरक्षा, शिक्षण आणि इतर बऱ्याच विषयांबाबत चर्चा झाली. यावेळी डिफेन्स टेक्नॉलॉजी बाबत संयुक्तपणे विकास आणि उत्पादनासाठी सहयोग करतील यासाठी दोन्ही देश वचनबद्ध झाले.

PM Modi France Visit
Emmanuel Macron: फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी भारताचे मानले आभार, हिंदीतून केलं ट्विट; म्हणाले, निर्णायक भूमिका...

राफेल अन् पाणबुड्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये असतानाच १३ जुलै रोजी संरक्षण अधिग्रहण परिषदेने राफेल आणि स्कॉर्पिन पाणबुड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. यामुळे भारत फ्रान्सकडून तीन स्कॉर्पिन दर्जाच्या पाणबुड्या, २२ राफेल-एम आणि चार ट्रेनर राफेल अशी एकूण २६ राफेल विमाने खरेदी करणार आहे. यामुळे भारताच्या नौसेनेची ताकद वाढणार आहे.

फ्रान्समध्ये यूपीआय, नवीन दूतावास

या भेटीमध्ये पंतप्रधानांनी सांगितलं, की लवकरच फ्रान्समध्ये देखील यूपीआय पेमेंटची सुरुवात होईल. सध्या ११ देशांमध्ये यूपीआय पेमेंट उपलब्ध आहे. यासोबतच, फ्रान्सच्या दक्षिणेकडे असणाऱ्या मार्सिले शहरात नवीन भारतीय वाणिज्य दूतावास उभारण्यात येईल.

PM Modi France Visit
PM Modi France Visit: फ्रान्समध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! PM मोदींनी केली 'ही' मोठी घोषणा

व्हिसाबाबत निर्णय

फ्रान्समध्ये उच्चशिक्षण घेण्याचा मानस असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय यावेळी घेण्यात आला. पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेण्यासाठी फ्रान्सला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच वर्षांचा दीर्घकालीन व्हिसा मिळणार असल्याचं मोदींनी स्पष्ट केलं.

व्यापाऱ्यांशी भेट

पंतप्रधान मोदींनी या दौऱ्यामध्ये फ्रान्समधील दिग्गज उद्योगपतींची भेट घेतली. दोन्ही देशांमधील व्यापाऱ्यांनी द्विपक्षीय संबंध मजबूत होण्यासाठी मोठं योगदान दिलं असल्याचं मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी फ्रान्समधील भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतात अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन देखील केलं.

मोदींचा सन्मान

दरम्यान, फ्रान्समध्ये पंतप्रधान मोदींना देशातील सर्वोच्च नागरी आणि लष्करी सन्मान 'ग्रँड क्रॉस ऑफ दि लीजन ऑफ ऑनर'ने पुरस्कृत करण्यात आलं. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच भारतीय ठरले. हा १४० कोटी भारतीयांचा सन्मान असल्याचं मोदी यावेळी म्हणाले.

PM Modi France Visit
PM Modi UAE Visit : फ्रान्स दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी UAE ला रवाना; अबूधाबीच्या प्रिन्सची घेणार भेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()