PM Modi in Bhutan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘ऑर्डर ऑफ ड्रूक ग्यालपो’ या भूतानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने शुक्रवारी गौरविण्यात आले. मोदी आजपासून दोन दिवसांच्या भूतानच्या दौऱ्यावर आले आहेत. हा सन्मान प्राप्त करणारे ते पहिले परदेशी पंतप्रधान ठरले आहेत.
भूतानचे राजे जिग्मे वांगचुक यांच्या हस्ते मोदी यांना ‘ऑर्डर ऑफ ड्रूक ग्यालपो’ने गौरविण्यात आले. मोदी यांनी हा सन्मान १४० कोटी भारतीयांना समर्पित केला. मोदी म्हणाले. ‘‘एक भारतीय म्हणून माझ्या जीवनातील आजचा दिवस खूप मोठा आहे. भूतानच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने तुम्ही माझा सन्मान केला आहे. प्रत्येक पुरस्कार महत्त्वपूर्ण असतो, पण अन्य देशातील पुरस्कार मिळाल्यानंतर दोन्ही देश योग्य दिशेने पुढे जात असल्याची जाणीव होते.’’
भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी पारो विमानतळावर आज सकाळी मोदी यांची गळाभेट घेऊन स्वागत केले. त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ही देण्यात आला. तोबगे यांनी ‘एक्स’वर ‘भूतान में आपका स्वागत है मेरे भाई नरेंद्र मोदीजी’ अशी हिंदीत पोस्ट पंतप्रधानांचे स्वागत केले. थिंफूतील ‘ताशिचो जोंग’ राजवाड्यात पोहचल्यानंतर त्यांनी राजे जिग्मे वांगचुक यांची भेट घेतली. मोदी यांच्या स्वागतासाठी भूतानमधील सर्व शाळा आज बंद ठेवण्यात आल्या होत्या.
भारत आणि भूतान हे एका समान वारशाचा हिस्सा आहे
भगवान बुद्धांची शिकवण भूतानने आत्मसात केली, ती जपली
भूतान आता भारताचा अवकाश मोहिमांतील भागीदार आहे
भूतानच्या शास्त्रज्ञांनी ‘इस्रो’च्या सहकार्याने उपग्रहाचे प्रक्षेपण केले
भूतानमधील पुरस्कारांमध्ये सर्वांत मोठा पुरस्कार
जीवनातील उत्कृष्ट कामगिरी आणि समाजातील योगदानाचे प्रतीक
पुरस्कार देण्यास सुरुवात केल्यापासून आतापर्यंत केवळ चार प्रतिष्ठित व्यक्तींनाच हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.