PM Modi: प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन प्रमुख पाहुणे असण्याची शक्यता; वर्षभरात दुसरा भारत दौरा

अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी बुधवारी यासंदर्भात माहिती दिली
PM Modi
PM ModiEsakal
Updated on

26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. नुकत्याच नवी दिल्लीत पार पडलेल्या G20 शिखर परिषदे दरम्यान जो बायडेन यांना हे निमंत्रण देण्यात आले आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी बुधवारी (20 सप्टेंबर) यासंदर्भात माहिती दिली.

एरिक गार्सेटी यांनी माहिती देताना सांगितलं की, दिल्लीतील G-20 शिखर परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या द्विपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं. दरम्यान भारतात QUAD शिखर परिषदेचं नियोजन केलं जात आहे का? यावर, अमेरिकेचे भारतातील राजदूत गार्सेटी यांनी मला याबाबत काहीच कल्पना नसल्याचं सांगितलं आहे. याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे.

जो बायडेन यांनी हे निमंत्रण स्वीकारले तर 6 महिन्यांतील त्यांचा हा दुसरा भारत दौरा असेल. यापूर्वी 2015 मध्ये पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. भारत-अमेरिका संबंधातील हा मोठा क्षण होता.

PM Modi
‘जी २०’ आणि भूराजकीय महाखेळ

यानंतर 2018 मध्ये देखील 26 जानेवारीला अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कार्यक्रमांसाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, ते भारतात येऊ शकले नाहीत. त्यांच्या जागी आसियान देशांच्या नेत्यांचा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये समावेश करण्यात आला. 2023 मध्ये, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी हे भारताचे प्रमुख पाहुणे बनले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना भारतात निमंत्रित करण्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जारी केलेली नाही.

भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अलीकडच्या काळात खूपच घट्ट झाले आहेत. पंतप्रधान मोदी जून महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते आणि त्यानंतर जो बायडेन G20 साठी भारतात आले होते. या दोन्ही भेटींमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

PM Modi
Global Leader : G20 परिषदेमुळे मोदींच्या लोकप्रियतेत वाढ; 'ग्लोबल लीडर्स' यादीत पुन्हा पटकावलं पहिलं स्थान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.