PM Modi in USA : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची 'ती' इच्छा पूर्ण झाली; PM मोदींनी 2014 चा सांगितला किस्सा

भारतीय अमेरिकन लोकांनी अमेरिकेत (America) खूप मोठा पल्ला गाठला आहे.
Joe Biden Narendra Modi
Joe Biden Narendra Modiesakal
Updated on
Summary

मला भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांवर अधिक बोलायचं नाही. कारण, आमची मैत्री खूप वर्षांपूर्वीची आहे.

वॉशिंग्टन : भारतीय अमेरिकन लोकांनी अमेरिकेत (America) खूप मोठा पल्ला गाठला आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केलं. व्हाईट हाऊसमध्ये आयोजित केलेल्या स्टेट डिनरदरम्यान ते बोलत होते.

मोदी (Narendra Modi) म्हणाले, भारतीय वंशाच्या लोकांना आणि भारताच्या लोकशाही परंपरांचा, तसेच आपल्या संस्कृतीचा अभिमान असलेल्या लोकांना अमेरिकेत सतत आदर मिळत आहे. अमेरिकेचा सर्वसमावेशक समाज आणि अर्थव्यवस्था मजबूत करण्यात या लोकांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावलीये.

Joe Biden Narendra Modi
Devendra Fadnavis : उदयनराजे-शिवेंद्रराजे वादावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, तिथं गंभीर घडलं असं..

पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी स्टेट डिनरचं आयोजन केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. ते म्हणाले, 'आज या अप्रतिम डिनरचं आयोजन केल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचं मनःपूर्वक आभार मानतो. माझी भेट यशस्वी करण्यासाठी वैयक्तिक लक्ष दिल्याबद्दल मी डॉ. जिल बायडेन यांचाही आभारी आहे.

Joe Biden Narendra Modi
Karad : कोणीही पंढरपूरला येऊ शकतं, पण तिथं येऊन राजकारण करु नये; उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

यावेळी पीएम मोदींनी त्यांच्या 2014 च्या अमेरिका दौऱ्याचाही उल्लेख केला. ते म्हणाले, 'मला भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांवर अधिक बोलायचं नाही. कारण, आमची मैत्री खूप वर्षांपूर्वीची आहे.

2014 मध्ये तुम्ही माझ्यासाठी डिनरचं आयोजन केलं होतं, पण योगायोगानं त्यावेळी माझा 9 दिवसांचा नवरात्रीचा उपवास होता, तेव्हा तुम्ही मला वारंवार विचारत होता की, तुम्ही काही खाणार नाहीत का? मला वाटतं, त्यावेळेस मला प्रेमानं खाऊ घालण्याची तुमची इच्छा आज पूर्ण होत आहे, असं मोदींनी सांगितलं.

Joe Biden Narendra Modi
Monsoon Update : दिल्ली, महाराष्ट्रासह 'या' 26 राज्यांत आज पावसाची शक्यता; ऑरेंज अलर्ट जारी

बायडेन अमेरिकेचे उपराष्ट्रपती असतानाच्या क्षणांचा पंतप्रधान मोदींनी आवर्जुन उल्लेख केला. ते म्हणाले, 'जवळपास दशकभरापूर्वी तुम्ही उपराष्ट्रपती असताना मी तुम्हाला पहिल्यांदा भेटलो होतो, आजही मला तुमच्यातील तीच बांधिलकी दिसतेय. तुम्ही बोलण्यात साधे आहात, पण तुमची कृती मजबूत आहे. तुमच्या या प्रवासात डॉ. जिल बायडेन यांचं मोठं योगदान आहे.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.