PM Modi US Visit : महासत्तेशी ‘पॉवरफुल’ भागीदारी; जेट इंजिनाची निर्मिती, सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये करारांची घोषणा

संयुक्त अवकाश मोहिमेसाठीही ‘नासा’ आणि ‘इस्रो’दरम्यान करार
PM Modi US Visit
PM Modi US Visit sakal
Updated on

वॉशिंग्टन/नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांमधील कंपन्यांनी विविध करार केले. यानुसार, अमेरिकेतील जनरल इलेक्ट्रिक एअरोस्पेस कंपनीने हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) बरोबर ‘एफ४१४’ इंजिनची सहनिर्मिती करण्याबाबतचा सामंजस्य करार केला आहे.

या करारावर मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या भेटीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. याशिवाय, संयुक्त अवकाश मोहिमेसाठीही ‘नासा’ आणि ‘इस्रो’दरम्यान करार झाला आहे.

जनरल इलेक्ट्रिक (जीई) आणि ‘एचएएल’ यांच्यातील करारानुसार, भारतीय लष्कराच्या गरजेनुसार लढाऊ विमानांसाठी अत्यंत उच्च दर्जाची इंजिनची सहनिर्मिती केली जाणार आहे. ‘एफ४१४’ हे अत्यंत उच्च क्षमतेचे इंजिन असून दोन्ही देशांच्या आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेत यामुळे मोलाची भर पडेल, असे ‘जीई’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या इंजिनचा वापर भारतीय हवाई दलाच्या तेजस या लढाई विमानांमध्ये केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या इंजिननिर्मितीचे ८० टक्के तंत्रज्ञान भारताकडे हस्तांतरीत केले जाणार आहे. अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ आणि ‘इस्रो’ यांनी २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर संयुक्त मोहिम नेण्यास सहमती दर्शविली आहे.

नागरी उद्देशाने अवकाश मोहिमा राबविण्यासाठी असलेल्या ‘आर्टिमिस ॲकॉर्ड’मध्ये सहभागी होण्याचा निर्णय भारताने याद्वारे घेतला आहे. अवकाश मोहिमांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या, मात्र कोणावरही बंधनकारक नसणाऱ्या सूचनांचा समावेश ‘आर्टिमिस ॲकॉर्ड’मध्ये आहे.

या वर्षी अवकाश मोहिमेचा आराखडा तयार करण्यासाठी ‘नासा’ आणि ‘इस्रो’ प्रयत्न करतील, असे ‘नासा’च्या अधिकाऱ्याने सांगितले. या सर्व घोषणांवर मोदी-बायडेन यांच्यातील चर्चेनंतर शिक्कामोर्तब होणार आहे.

नॅनो युरियाची अमेरिकाला निर्यात

भारतात विकसित केलेला नॅनो युरियाची आता अमेरिकेला निर्यात होणार आहे. ‘इफको’ या सहकारी संस्थेने कॅलिफोर्नियातील कपूर एन्टरप्रायजेस सोबत सामंजस्य करार केला असल्याचे ‘इफको’ने जाहीर केले आहे. नॅनो युरिया उत्तम पौष्टिक गुणवत्तेसह उत्पादन वाढवते आणि रासायनिक खतांचा वापर कमी करते.

PM Modi US Visit
Modi In America : मुसळधार पावसात राखला राष्ट्रगीताचा मान! पंतप्रधान मोदी भिजले पावसात; Video Viral

हे पाणी, हवा आणि मातीचे प्रदूषण कमी करते, ज्याचा भूगर्भातील पाणी आणि मातीच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम होतो. परिणामी, हवामान बदलावर सकारात्मक प्रभाव पडतो, ग्लोबल वार्मिंगमध्ये लक्षणीय घट होऊन शाश्वत शाश्वत विकास होतो. इफको नॅनो युरिया (द्रव) वनस्पतींच्या पोषणासाठी प्रभावी आणि कार्यक्षम असल्याचे आढळून आले आहे.

हे करार अपेक्षित

- भारतात इंजिनची निर्मिती करण्यास जनरल इलेक्ट्रिक कंपनीला परवानगी

- अमेरिकी नौदलाच्या जहाजांना भारतीय बंदरांवर दुरुस्तीच्या कामासाठी येण्यास परवानगी

- अमेरिकेकडून एमक्यू-९ बी सी-गार्डियन ड्रोन खरेदी

- एच-१ बी व्हिसाच्या नूतनीकरणाची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी नवीन सुविधा

- सिएटलमध्ये भारताची तर अहमदाबाद, बंगळूरमध्ये अमेरिकेची वाणिज्य कचेरी उघडणार

‘मायक्रॉन’ गुजरातमध्ये गुंतवणूक करणार

भारतात सेमीकंडक्टर क्षेत्राचा विकास करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत ‘मायक्रॉन टेक्नॉलॉजी’च्या प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर या कंपनीने भारतात ८० कोटी डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुजरातमध्ये हा प्रकल्प उभारला जाणार असून भारतीय राष्ट्रीय सेमीकंडक्टर अभियानाच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविला जाणार आहे. एकूण २.७५ अब्ज डॉलरचा हा प्रकल्प असेल. अमेरिकेतील ॲप्लाइड मटेरिअल्सनेही भारतात सेमिकंडक्टर केंद्र उभारण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

PM Modi US Visit
PM Modi US Visit: PM मोदींच्या दौऱ्याचा संपुर्ण खर्च उचलणार अमेरिका! कारण..

याशिवाय, लॅम्ब रिसर्च ही कंपनीही भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात भारतीय अभियंत्यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार आहे. याशिवाय, खनिज सुरक्षा, पर्यावरण, वित्त, अत्याधुनिक तंत्रज्ञान, दूरसंचार या क्षेत्रांसंबंधीही काही घोषणा येत्या काही काळात अपेक्षित आहेत.

‘हा सर्व भारतीयांचा सन्मान’

पं तप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज ‘व्हाइट हाऊस’मध्ये अत्यंत दिमाखदार स्वागत करण्यात आले. मोदी यांच्या स्वागताला बायडेन यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आणि वरीष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते.

PM Modi US Visit
PM Modi US Visit: "अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध...", जो बायडेन यांचे महत्त्वाचे विधान

तसेच भारतीय वंशाचे हजारो नागरिक ‘व्हाइट हाऊस’च्या परिसरात जमा झाले होते. ते ‘भारत माता की जय’, ‘मोदी मोदी’’ अशा घोषणा देत होते. स्वागतानंतर २१ तोफांची सलामी देण्यात आली. भारताबरोबरील भागीदारी ही २१ व्या शतकातील सर्वांत महत्त्वाची भागीदारी असल्याचे बायडेन यावेळी म्हणाले.

तर, ‘जगाच्या कल्याणासाठी आणि भल्यासाठी आम्ही एकत्रित काम करू,’ अशी ग्वाही मोदी यांनी यावेळी दिली. आपले झालेले भव्य स्वागत म्हणजे भारतातील १४० कोटी जनतेचा आणि अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या जनतेचा सन्मान असल्याचे सांगत मोदी यांनी बायडेन यांचे आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.