PM Modi in Egypt : पंतप्रधान मोदींच्या पहिल्या इजिप्त दौऱ्याचा अर्थ काय? 5 मुद्द्यांमध्ये समजून घ्या

इजिप्तच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींना राज्य भेटीसाठी आमंत्रित केले होते.
PM Modi’s Egypt visit
PM Modi’s Egypt visiteSakal
Updated on

अमेरिकेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 ते 25 जून दरम्यान इजिप्तला भेट देणार आहेत. राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी उत्तर आफ्रिकेच्या या देशाला भेट देत आहेत. जानेवारीमध्ये भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात पंतप्रधान मोदी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते, तेव्हा इजिप्तच्या राष्ट्रपतींनी त्यांना राज्य भेटीसाठी आमंत्रित केले होते. (PM Modi Egypt Visit)

यादरम्यान, सुरक्षा ते व्यापार आणि गुंतवणुकीपर्यंतच्या क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर दोन्ही बाजू सहमत होण्याची अपेक्षा आहे. 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच इजिप्त दौरा असेल. त्याच वेळी, 1997 नंतर एका भारतीय नेत्याची ही पहिलीच द्विपक्षीय भेट आहे. या दौऱ्याचे महत्त्व काय आहे, ते पाच महत्त्वाच्या मुद्यांमधून समजून घ्या.

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इजिप्त दौऱ्याकडे द्विपक्षीय संबंधांसाठी गेम चेंजर म्हणून पाहिले जात आहे. दाऊदी बोहरा समुदायाच्या मदतीने जीर्णोद्धार करण्यात आलेल्या 11व्या शतकातील अल-हकीम मशिदीला पंतप्रधान मोदी भेट देणार आहेत. त्याचवेळी, पहिल्या महायुद्धात इजिप्तसाठी शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान मोदी हेलिओपोलिस वॉर सेमेटरीलाही भेट देतील.

PM Modi’s Egypt visit
PM Modi Egypt Visit: पंतप्रधान मोदी इजिप्तच्या अल हकीम मशिदीला भेट देणार, मोदींनी आतापर्यंत किती मशिदींना भेट दिलीय?

2. इजिप्तच्या राष्ट्रपतींनी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय मंत्र्यांच्या गटाशी पंतप्रधान मोदी चर्चा करणार आहेत. भारताशी संबंध सुधारण्यासाठी या गटाची स्थापना करण्यात आली आहे. यानंतर पीएम मोदी आणि राष्ट्राध्यक्ष अल-सिसी समोरासमोर बसून चर्चा करतील आणि अनेक करारांवर स्वाक्षरी करतील.

3. इजिप्तचे राजदूत वेल मोहम्मद अवद हमेद यांनी सांगितले की, लष्करी उपकरणांच्या सह-उत्पादनाव्यतिरिक्त, सुएझ कालव्याच्या आर्थिक क्षेत्रामध्ये भारतासाठी समर्पित स्लॉटवर देखील दोन्ही देशांच्या बैठकीत चर्चा केली जाईल. याशिवाय ग्रीन हायड्रोजन आणि पर्यटनात भारतीय गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भेटीदरम्यान दोन्ही प्रमुखांमध्ये कृषी, लघु आणि मध्यम उद्योग, माहिती तंत्रज्ञान, व्यापार प्रोत्साहन आणि संस्कृतीवर चार ते पाच करार होऊ शकतात.

4. या वर्षी जानेवारीमध्ये राष्ट्राध्यक्ष अल-सिसी भारताच्या दौऱ्यावर असताना त्यांनी दोन्ही देशांमधील संबंध धोरणात्मक भागीदारीकडे नेण्याचे मान्य केले होते. पीएम मोदींच्या या भेटीबाबत असे बोलले जात आहे की, भारत आणि इजिप्त त्यांच्यातील संबंधांचे सर्व पैलू मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. सप्टेंबरमध्ये नवी दिल्ली येथे होणाऱ्या G20 परिषदेत भारताने इजिप्तला विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे.

5. गेल्या आठवड्यात परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) पंतप्रधान मोदींच्या इजिप्त दौऱ्याबाबत अधिकृत निवेदन जारी केले. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले होते- "भारत आणि इजिप्तमधील संबंध प्राचीन व्यापारी आणि आर्थिक संबंधांवर तसेच सांस्कृतिक संबंधांवर आधारित आहेत." विशेष म्हणजे दोन्ही देश आपले संबंध दृढ करण्यासाठी गंभीर आहेत.

PM Modi’s Egypt visit
PM Modi Egypt Visit : अमेरिकेनंतर पंतप्रधान मोदी थेट इजिप्तच्या दौऱ्यावर; दोन्ही देशांमधील व्यापाराच्या दृष्टीने करणार चर्चा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.