Ahlan Modi : पंतप्रधानांच्या UAE मधील कार्यक्रमात 35 हजारांहून अधिक भारतीयांनी गायलं वंदे मातरम्; Video Viral

पंतप्रधान नरेंद्र मोदी UAEच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी अबुधाबी येथील झायेद स्पोर्ट्स स्टेटियममध्ये 'अहलान मोदी' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमामध्ये ३५ हजारांहून अधिक भारतीयांनी एकत्रितपणे वंदे मातरम् गायलं.
Ahlan Modi
Ahlan Modi esakal
Updated on

PM Modi UAE Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी UAEच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी अबुधाबी येथील झायेद स्पोर्ट्स स्टेटियममध्ये 'अहलान मोदी' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमामध्ये ३५ हजारांहून अधिक भारतीयांनी एकत्रितपणे वंदे मातरम् गायलं. यावेळी भारतीयांच्या देशप्रेमाचं एक वेगळं दृश्य जगाने अनुभवलं. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. यावेळी पंतप्रधानांनी UAE स्थित भारतीयांना संबोधित केले.

दोन देशांच्या दौऱ्यावर असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंगळवारी अबुधाबी येथे आगमन झाले. अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर मोदी आणि यूएईचे अध्यक्ष नहयान यांच्यात प्रादेशिक स्थिती आणि जागतिक मुद्द्यावर चर्चा झाली. यूएई हा पश्‍चिम आशियातील सामरिक आणि ऊर्जा क्षेत्रातील भारताचा नजीकचा भागीदार समजला जातो. तसेच आजच्या मुक्त व्यापार करारामुळे (एफटीए) उभय देशातील व्यापाराला आणि व्यवहारांना बुस्ट मिळणार आहे. द्विपक्षीय गुंतवणूक करारावर दोन्ही नेत्यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

हिंदू मंदिराच्या बांधकामासाठी जमीन दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचे आभार मानले. बुधवारी पंतप्रधान BAPSच्या मंदिराचं उद्घाटन करणार आहेत. हे मंदिर शेख मोहम्मद यांच्या भारताप्रती असलेल्या आत्मियतेचं प्रतिक असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी स्वामिनारायण मंदिराचे उद्‌घाटन होणार आहे. येथील सरकारने अबुधाबी-दुबई महामार्गावरील अबु मुरेखा भागात दिलेल्या २७ एकर जागेवर मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. मंदिराची रचना अत्यंत सुबक करण्यात आली आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूंना नदीच्या घाटासारखी बांधणी करण्यात आली असून नदीच्या प्रवाहाप्रमाणे पाणीही सोडण्यात आले आहे. हे पाणी गंगा आणि यमुना नदीतून आणण्यात आले आहे.

या घाटावर बसल्यावर लोकांना वाराणसीप्रमाणे वाटावे, असा उद्देश आहे. गंगा-यमुनेच्या संगमासारखे वातावरण निर्माण करण्यात आले असून दोन्ही बाजूंच्या पाण्याचा प्रवाह जिथे एकत्र येतो, तिथे लेझर किरण सोडून सरस्वती नदीचे अस्तित्वही भासविण्यात आले आहे.

Ahlan Modi
Sonia Gandhi : सोनिया गांधी उद्या राज्यसभेसाठी अर्ज भरणार? 'इथून' दाखल करणार उमेदवारी

या मंदिरासाठी राजस्थानातील गुलाबी दगडाचा वापर करण्यात आला आहे. गुजरात आणि राजस्थानमधील कारागिरांनी अत्यंत सुंदर नक्षीकाम केलेल्या दगडाचे २५ हजार भाग भारतातून तिकडे पाठविण्यात आले होते. सुमारे दोन लाख चौरस फूट दगड वाहून नेण्यासाठी सातशे कंटेनरचा वापर झाल्याचे बांधकाम व्यवस्थापक विशाल ब्रह्मभट यांनी सांगितले. मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर लाकडाचाही वापर करण्यात आला असून हे लाकूडही भारतातून आयात करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.