पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा सध्या फारच चर्चेचा विषय ठरला आहे. अमेरिका दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्या वॉशिंग्टन येथील एका कार्यक्रमात भाग घेतला. त्यानंतर मोदी व्हाईट हाऊसमध्ये गेले. तिथे राष्ट्रपती जो बायडेन यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी मोदी यांनी फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना खास गिफ्ट देत भारतातील महाराष्ट्रासहीत दहा राज्यातील महत्त्वाच्या वस्तू देखील गिफ्ट दिल्या. PM Narendra Modi gifts a lab-grown 7.5-carat green diamond to US First Lady Dr Jill Biden
महाराष्ट्राचा गूळ, पंजाबचे तूप, उत्तराखंडचे तांदूळ आणि हिरा अशा अनेक वस्तूंचा मोदींनी दिलेल्या गिफ्टमध्ये समावेश आहे.
फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना 7.5 कॅरेटचा हिरा
पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना 7.5 कॅरेटचा हिरवा हिरा गिफ्ट दिला. हा हिरा पृथ्वीवरील ऑप्टिकल आणि रासायनिक गुण दर्शवतो. हा हिरा पर्यावरण अनुकूलही आहे. कारण या हिऱ्याच्या निर्मितीसाठी पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेचा वापर करण्यात आला आहे.
राजस्थानमधील हाताने बनवलेलं 24 कॅरेट हॉलमार्कचं सोन्याचं नाणं, तसेच 99.5 टक्के कॅरेट चांदीचे नाणे. पंजाबचे तूप
महाराष्ट्राचा गुळ, उत्तराखंडचे तांदूळ, तामिळनाडूचे तिळ, कर्नाटकातील मैसूरमधील चंदनाचा तुकडा, पश्चिम बंगालच्या कुशल कारागिरांनी तयार केलेले चांदीचे नारळ, गुजरातचे मीठ अशा अनेक भेटवस्तु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.
श्रीगणेशाची मूर्ती तसेच दिवा
पंतप्रधान मोदींसाठी आज व्हाईट हाऊसमध्ये विशेष डिनरचं आयोजन करण्यात आलं होतं. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आदरातिथ्य केलं. तर मोदींसाठी खास जेवणाचा संपूर्ण शाकाहारी मेनू ठेवण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.