दुसऱ्या महायुध्दाच्या काळात पोलंडवासीयांना कोल्हापुरात आश्रय देण्यात आला होता. पोलंडवासीयांचे कोल्हापूरशी ऋणानबंध जोडले गेले, ते आजही कायम आहेत.
वॉर्सा (पोलंड) : पोलंडच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल येथील वळीवडे-कोल्हापूर छावणी स्मारकाला भेट देत आदरांजली वाहिली. ‘दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कोल्हापूरच्या राजघराण्याने (Royal Family of Kolhapur) पोलंडच्या (Poland) महिलांना व बालकांना आश्रय देत मानवतेला सर्वोच्च स्थान दिले होते, असे मोदी म्हणाले.