COP28 : आंतरराष्ट्रीय पर्यावरण बदल समिट भारतात होणार; PM मोदींची दुबईत घोषणा

पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेत संतुलन राखणारा भारत एक उत्कृष्ट उदाहरण असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले.
COP28 : आंतरराष्ट्रीय पर्यावरण बदल समिट भारतात होणार; PM मोदींची दुबईत घोषणा
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या दुबईत सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या जागतीक जलवायू कारवाई शिखर संमेलनाला (COP28) हजेरी लावली. या ठिकाणी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केलं.

यावेळी मोदी म्हणाले, पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यांच्यामध्ये संतुलन राखल्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून भारत जगासमोर उभा आहे. तसेच यावेळी त्यांनी पुढची COP33 ही आंतरराष्ट्रीय पर्यावरण बदल समिट भारतात घेण्याचा प्रस्ताव ठेवला. (PM Narendra Modi proposes to host COP33 in India in 2028 in COP28 at Dubai)

मोदी काय म्हणाले?

या शिखर संमेलनात मोदी म्हणाले, "भारतात जगातील १७ टक्के लोक राहतात. याशिवाय वैश्विक कार्बन उत्सर्जनात भारताचं योगदान ४ टक्क्यांहून कमी आहे. तसेच भारत जगातील त्या काही अर्थव्यवस्थांपैकी एक आहे जो एनडीसीचं लक्ष्य पूर्ण करण्याच्या वाटेवर आहे. भारतानं पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेदरम्यान खूपच चांगला समन्वय राखत जगासमोर विकासाचं एक मॉडेल सादर केलं आहे" (Latest Marathi News)

COP28 : आंतरराष्ट्रीय पर्यावरण बदल समिट भारतात होणार; PM मोदींची दुबईत घोषणा
होत्याचं नव्हतं! MBBSची डिग्री घेऊन 'तो' आनंदानं निघाला अन् रस्त्यात सापानं...

सीओपी ३३ च्या आयोजनाचा प्रस्ताव

दुबईत COP28 संमेलनात पंतप्रधान मोदींनी २०२८ मध्ये भारतात सीओपी ३३ संमेलनाचं आयोजन करण्यााच प्रस्ताव ठेवला. त्यांनी म्हटलं की, भारत जलवायू परिवर्तन प्रक्रियेसाठी संयुक्त राष्ट्र फ्रेमवर्कसाठी प्रतिबद्ध आहेत. (Marathi Tajya Batmya)

यासाठी या मंचावर २०२८ मध्ये भारतात सीओपी ३३ शिखर संमेलनाच्या आयोजनाचा प्रस्ताव ठेवला आहे. त्याचबरोबर भारत राष्ट्रीय स्तरावर निश्चित करण्यात आलेलं लक्ष्य प्राप्त करण्याच्या मार्गावर आहे. निश्चित केलेल्या वेळापूर्वीच ११ वर्षे आधीच भारतानं आपलं कार्बन उत्सर्जन तीव्रतेचं लक्ष साध्य केलं आहे, असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.