आज रशिया-युक्रेन या देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा आज १२ वा दिवस असून या दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या चर्चेची आज तिसरी फेरी पार पडणार आहे. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांच्याशी फोनवरुन तब्बल ३५ मिनेटे संवाद साधल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या चर्चेदरम्यान मोदींनी भारतियांना परत आणण्यासाठी युक्रेनच्या सरकारने केलेल्या मदतीबद्दल आभार देखील मानले. (Russia Ukraine War)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेत युक्रेनमध्ये अडकेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन सरकारने केलेल्या मदतीबद्दल पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे आभार मानले. तसेच सुमीमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये पंतप्रधानांनी युक्रेन सरकारकडून पाठिंबा मागितला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. (PM Modi spoke to zelenskyy)
दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये झालेला चर्चेचा हा फोन कॉल सुमारे ३५ मिनिटे चालला. नेत्यांनी युक्रेनमधील बदलत्या परिस्थितीवर चर्चा केली असून पंतप्रधानांनी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या थेट संवादाचे कौतुक केले. अशी माहिती भारत सरकारच्या सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.
याआधीच युक्रेनने रशियासोबत सुरु असलेलं युद्ध लवकरात लवकर थांबवलं जावं, यासाठी पुन्हा एकदा भारताकडे विनंती केली आहे. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधणार आहेत. दुसरीकडे, आज पुन्हा रशियानं तात्पुरता युद्धविराम घोषित केला आहे. याबाबत स्पुटनिकने माहिती दिली आहे. यापूर्वी रशियानं काही तासांसाठी युद्धा थांबवण्याची घोषणा केली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.