भारतातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील तंत्रज्ञान भागीदारीनंतर देशात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होतील. याबाबत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावर तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारी ही मोठी उपलब्धी आहे. मायक्रॉन, अप्लाइड मटेरियल्स आणि लॅम रिसर्च सारख्या कंपन्यांनी केलेल्या घोषणेमुळे भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रात खूप विकास होईल. येत्या काही दिवसांत थेट 80,000 ते 1 लाख नवीन नोकऱ्या भारतात येतील, असे राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले.
आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, राजीव चंद्रशेखर म्हणाले, "गेल्या दोन वर्षात इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाने 10-12 लाख नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. भारतात मेमरी चिप्स बनवण्यासाठी मायक्रॉनच्या ताज्या घोषणा भारतासाठी महत्त्वाच्या आहेत. मला वाटते की किमान 80,000 ते 1 लाख नवीन नोकऱ्या भारतात निर्माण होतील."
अमेरिकन कंपनी मायक्रोन टेक्नॉलॉजीद्वारे गुजरातमध्ये 270 करोडचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यामध्ये सेमीकंडक्टर असेंब्ली आणि चाचणी सुविधा उभारली जाणार आहे. नरेंद्र मोदी आणि मायक्रॉनचे अध्यक्ष आणि सीआओ संजय मेहरोत्रा यांच्यात वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या बैठकीनंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
मायक्रोनने कंपनीशिवाय आणखी एका सेमीकंडक्टर अप्लाइड मटेरियल्सनेही एक सहयोगी अभियांत्रिकी केंद्र तयार करण्याची आपली योजना जाहीर केली आहे. ते चार वर्षांत भारताची 400 दशलक्ष गुंतवणूक करणार आहे. तसेच आणखी एक वेफर-फॅब्रिकेशन उपकरण पुरवठादार लॅम रिसर्चने 60,000 पर्यंत उच्च तंत्रज्ञान अभियंत्यांसाठी भारतात प्रशिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.
सेमीकंडक्टर, एआय, क्वांटम आणि उच्च-कार्यक्षमता संगणन क्षेत्रातील पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यातील घोषणा भारतात रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाच्या आहेत. भारतातील तरुणांना अमेरिका स्टार्टअप्स आणि संशोधन संस्थांसोबत काम करण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध होतील. जागतिक स्तरावर आणि भविष्यातील तंत्रज्ञानाला नवीन आकार मिळेल, असे राजीव चंद्रशेखर यांनी स्पष्ट केले.
राजीव चंद्रशेख म्हणाले, ही फक्त एक सुरुवात आहे. कारण भारत जागतिक इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर मूल्य आणि पुरवठा साखळीचा एक महत्त्वपूर्ण आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून झपाट्याने विकसित होत आहे. आणखी बरेच काही घडायचे आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.