Israel-Hamas War: हमास-इस्रायल युद्धामध्ये बेपत्ता-ओलीसांच्या कुटुंबीयांची नेतान्याहू यांनी घेतली भेट, केलं सांत्वन

इस्रायलमधील एकूण 1300 लोकांचा मृत्यू झाला आणि शेकडो लोक बेपत्ता झाले आहेत
Israel-Hamas War
Israel-Hamas WarEsakal
Updated on

हमास आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. या काळात इस्रायलमधील एकूण 1300 लोकांचा मृत्यू झाला आणि शेकडो लोक बेपत्ता झाले आहेत. अनेक लोकांना हमासच्या दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले आहे. दरम्यान, इस्रायलच्या पंतप्रधानांनी बेपत्ता आणि ओलीस ठेवलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबीयांशी बोलून पंतप्रधानांनी त्यांचे सांत्वन केले.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने ट्विटरवर पीडितांच्या कुटुंबीयांशी झालेल्या भेटीची माहिती दिली आहे. नेतन्याहू यांच्या कार्यालयाने ट्विट केले की, पंतप्रधान नेतन्याहू यांनी अटकेत असलेल्या आणि बेपत्ता लोकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पीडितांच्या नातेवाइकांनी नेतन्याहू यांच्यासोबतच्या भेटीनंतर सांगितले की, पंतप्रधानांनी आमच्या प्रियजनांना लवकरात लवकर आम्हाला पुन्हा भेटवण्याचे वचन दिले आहे. त्यांना लवकरच परत आणले जाईल.

Israel-Hamas War
Israel Attack Gaza: गाझाच्या नागरिकांना 3 तासांची डेडलाईन; दक्षिणेत सुरक्षित स्थळी जाण्यासाठी 'पाथ टू सेफ्टी' जारी

याव्यतिरिक्त, लोकांनी भेटीनंतर सांगितले नेतन्याहू यांनी कबूल केले की, त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख त्झाची हानेग्बी यांच्या टिप्पण्यांचे समर्थन केले नाही. नुकतेच हनेग्बी म्हणाले होते की, ज्या शत्रूला आम्ही पृथ्वीवरून नष्ट करण्याची शपथ घेतली आहे, त्या शत्रूशी इस्रायल कधीही बोलणार नाही.

शनिवारी तेल अवीवमध्ये एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये बेपत्ता व्यक्तींच्या एका नातेवाईकाने सांगितले की, माझ्या चुलत बहिणीला तिच्या नऊ महिने आणि चार वर्षांच्या मुलांसह दहशतवाद्यांनी घरातून पळवून नेले. ते सर्व निर्दोष आहेत. हमास ही दहशतवादी संघटना आहे. शक्य तितक्या लवकर त्याला जिवंत परत आणावे अशी आमची इच्छा आहे.

Israel-Hamas War
Gaza War: इस्राइलचा पलटवार अन् गाझा पट्टीत मृतदेहांचा खच; निष्पाप नागरिकांचे हाल पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

कुटुंबीयांची निदर्शने

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नुकतेच इस्रायलमधील तेल-अविव शहरात कुटुंबीयांनी निदर्शने केली होती. आंदोलकांच्या हातात फलक होते. ते घोषणा देत होते. हमासने ओलिस ठेवलेल्या महिला आणि मुलांची सुटका करण्यासाठी त्यांनी इस्रायली सरकारला आवाहन केले.

निदर्शनेमध्ये सहभागी झालेल्या एका तरुणाने सांगितले की, इस्रायली सरकारने हमासशी चर्चा करावी जेणेकरुन ओलीस ठेवलेल्या लोकांना सोडता येईल.ओलीसांची सुटका करण्यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करावेत. कैद्यांच्या अदलाबदलीची गरज भासल्यास त्याची अंमलबजावणी करता येईल.

Israel-Hamas War
India Vs Pakistan Israel : आम्ही खूश झालो, आता पाकिस्तानला... इस्राइलनं भारत - पाक सामन्यानंतर केलं ट्विट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.