Bangladesh PM: 'बांगलादेशचे तुकडे करत ख्रिश्चन राष्ट्र निर्मितीची ऑफर'! शेख हसीना यांचा दावा भारतासाठी ठरू शकतो डोकेदुखी

Sheikh Hasina: चट्टोग्राम आणि म्यानमारचा काही भाग एकत्र करून ख्रिश्चन देश निर्माण करण्याच्या कट आखला जात आहे. या प्रस्तावित ख्रिश्चन देशाचा तळ बंगालच्या उपसागरात असेल.
Bangladesh PM Sheikh Hasina
Bangladesh PM Sheikh HasinaEsakal
Updated on

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेश आणि म्यानमारच्या काही भागांचा वापर करून "पूर्व तिमोरसारखे ख्रिश्चन राष्ट्र" स्थापन करण्याचा कट आखण्यात येत होता.

तसेच बांग्लादेशात एका परदेशी राष्ट्राला एअरबेस बांधण्यास परवाणगी दिल्यास, 'एका गोऱ्या व्यक्तीने'ने पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशातील निवडणुका जिंकूण देण्याचे आश्वासन दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

भारताच्या अनेक राज्यांच्या सीमा बांगलादेशला लागून आहेत. त्यामुळे बांगलादेशात एखाद्या दुसऱ्या राष्ट्राचा लष्करी तळ असणे भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते.

या संपूर्ण प्रकरणावर बोलताना बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, चट्टोग्राम आणि म्यानमारचा काही भाग एकत्र करून ख्रिश्चन देश निर्माण करण्याच्या कट आखला जात आहे. या प्रस्तावित ख्रिश्चन देशाचा तळ बंगालच्या उपसागरात असेल.

या सर्व प्रकरणाचा खुलासा करताना, शेख हसीना यांनी ज्या देशाने वेगळे राष्ट्र स्थापन करण्याची ऑफर दिली दिली होती त्याचे नाव उघड केले नाही.

एअरबेसच्या प्रस्तावाबाबत विचारले असता त्यांनी हा प्रस्ताव एका गोऱ्या माणसाकडून आल्याचे सांगितले.

Bangladesh PM Sheikh Hasina
Israel: 'मोठी चूक झाली', राफावरील हल्ल्यानंतर नेतान्याहूंनी व्यक्त केली दिलगिरी; घेतली मोठी शपथ

या दोन्ही प्रस्तावावर स्पष्टीकरण देताना शेख हसीना म्हणाल्या, “मी स्पष्टपणे सांगितले आहे की, मी राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांची कन्या आहे, आम्ही आमचे स्वातंत्र्य युद्ध जिंकले आहे, मला देशाचा कोणताही भाग दुसऱ्या राष्ट्राला भाड्याने देऊन किंवा ताब्यात देऊन सत्तेवर यायचे नाही. आम्हाला इतर देशांची आणि शक्तींची गरज नाही."

Bangladesh PM Sheikh Hasina
Exit Poll: एक्झिट पोल अन् ओपिनियन पोल मध्ये काय आहे फरक? तुमचाही होतो गोंधळ? जाणून घ्या सर्वकाही

यावेळी पुढे बोलताना, शेख हसीना म्हणाल्या की, त्यांचे सरकार पाडण्यासाठी सतत कट रचले जात आहेत. वडील बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्यासोबत जे केले तेच माझ्याशी करणाच्या त्यांचा इरादा आहे. शेख हसीना म्हणाल्या की, षड्यंत्रांमुळे मला काही फरक पडत नाही आणि कधीही दबावाला बळी पडणार नाही.

15 ऑगस्ट 1975 रोजी बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या कुटुंबातील बहुतेक सदस्यांची हत्या करण्यात आली होती. शेख हसीना त्यावेळी परदेशात होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.