दहशतवाद्यांच्या मुख्यालयावर हल्ला; इराकमधील कारवाईत ‘पीएमएफ’चा म्होरक्या ठार

इराणचे पाठबळ असलेल्या पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्स (पीएमएफ) या दहशतवादी संघटनेच्या बगदादमधील मुख्यालयावर आज हवाई हल्ला झाला.
'US drone strike' in Baghdad kills Iran-linked PMF commander
'US drone strike' in Baghdad kills Iran-linked PMF commander
Updated on

बगदाद: इराणचे पाठबळ असलेल्या पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्स (पीएमएफ) या दहशतवादी संघटनेच्या बगदादमधील मुख्यालयावर आज हवाई हल्ला झाला. या हल्ल्यात या संघटनेचा एक प्रमुख म्होरक्या मारला गेला. हा हल्ला कोणी केला हे स्पष्ट झाले नसले तरीही यामागे अमेरिकेचा हात असल्याचा आरोप या संघटनेने केला आहे.

इस्राईल आणि हमास यांच्या युद्धाचे पडसाद इतर प्रदेशांतही उमटत असतानाच इराकची राजधानी बगदादमध्ये हा लक्ष्यवेधी हल्ला झाला. ‘पीएमएफ’ ही विविध दहशतवादी संघटनांची मिळून बनलेली संघटना असून तांत्रिकदृष्ट्या त्यांच्यावर इराकच्या सैन्याचे नियंत्रण आहे. इराणमध्ये कालच (ता. ५) मोठा स्फोट होऊन ९५ जणांचा मृत्यू झाला.

हा हल्ला कोणी केला, याचा शोध सुरू असतानाच इराणच्या पाठबळावरील संघटनेच्या मुख्यालयावर आज हल्ला झाला. या हल्ल्यात संघटनेच्या बगदादमधील कारवायांचा उपप्रमुख तालिब अल सैबी उर्फ अबु तकवा आणि आणखी एक जण मारला गेला. तकवा हा इमारतीच्या गॅरेजमध्ये त्याच्या मोटारीत बसला असतानाच त्या मोटारीवर बॉम्ब टाकण्यात आला. यानंतर इराकच्या लढाऊ विमानांनी आकाशात गस्त घालण्यास सुरुवात केली. (Latest Marathi News)

'US drone strike' in Baghdad kills Iran-linked PMF commander
Modi Lakshadweep Visit: मोदींनी लक्षद्वीपच्या बीचवर जाऊन फोटोशूट का केलं? अमित शाहांनी स्पष्टच सांगितलं

इस्राईल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून ‘पीएमएफ’ने इराक आणि सीरियामधील अमेरिकेच्या तळांवर शंभरहून अधिक हल्ले केले आहेत.

'US drone strike' in Baghdad kills Iran-linked PMF commander
Hamas Leader Killed : हमासचा म्होरक्या बैरूतमध्ये ठार; इस्राईलनेच हल्ला केला असल्याचा हिज्बुल्लाचा आरोप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.