काही दिवसांपूर्वी Better.com या कंपनीने झूम कॉलवरून आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं होते. आता एका ब्रिटिश शिपिंग कंपनीनेही झूम कॉलवरून आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याचं सांगितले आहे. P&O Ferris असं या शिपिंग कंपनीचे नाव 17 मार्च रोजी एका शिपिंग कंपनीने आपल्या कर्मचार्यांना एक व्हिडिओ संदेश पाठवून त्यांना कामावरून कमी केल्याचं सांगितलं आहे.
या व्हिडिओ कॉलमध्ये कंपनीच्या एका अधिकाऱ्याला म्हटलं की, “इथून पुढे जहाजाचा काम थर्ड पार्टी प्रोवायडरने पुरवलेल्या कर्मचाऱ्यांमार्फत करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. तुम्हाला कळवण्यात खेद वाटतो की, तुमची नोकरी संपुष्टात आली आहे. आज तुमच्या नोकरीचा शेवटचा दिवस आहे,” कर्मचार्याला नुकसान भरपाई दिली जाईल, असे या अधिकार्याने सांगितलं असलं तरी या घोषणेने कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहेत. (P&O Ferris 800 employees fired from Zoom Call!)
कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र कर्मचाऱ्यांना ईमेल, पोस्ट, कुरिअर आणि मॅसेजच्या माध्यमातून माहिती दिली होती, असा दावा एका कंपनीच्या एका अधिकाऱ्याने केला आहे. P&O Ferris या कंपनीचे दोन वर्षांत 200 दशलक्षचे पाऊंडचे नुकसान झाले आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की 800 हून अधिक लोकांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. या निर्णयावर नेटकऱ्यांनी तसेच देशातील राजकारण्यांनी तीव्र टीका केली होती.
Better.com ने झूम कॉलवर 900 कर्मचाऱ्यांना काढून टाकले होतं-
कोणत्याही पूर्व माहितीशिवाय झूम कॉलवर कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची ही पहिलीच वेळ नाही. बेटर डॉट कॉमचे सीईओ विशाल गर्ग यांना झूम कॉलवर कर्मचार्यांना काढून टाकल्याबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल आणि टीका झाली. त्यानंतर गर्गला एक छोटा ब्रेकवर पाठवण्यात आलं, पण लवकरच तो त्याच्या पदावर परतला. त्याच्या परतल्यामुळे Better.com वर सामूहिक राजीनामे सुरू झाले. गर्गच्या परतल्याने नाराज असलेले वरिष्ठ अधिकारी कंपनी सोडून गेले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.